आर्थिक स्थिती डबघाईला! रिझर्व्ह बँंकेकडून आणखी एका मोठ्या बँकेचा परवाना रद्द

MHLive24 टीम, 29 जुलै 2021 :-  सध्या देशातल्या सर्व बँका रिझर्व्ह बॅंकेच्या निशाण्यावर आहेत, जिथे कार्यप्रणाली व्यवस्थित होत नाहीत. गेल्या काही महिन्यांत रिझर्व्ह बँकेने सुमारे डझनभर कमकुवत सहकारी बँकांचे परवाने रद्द केलेत. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली आहे.

आता आर्थिक स्थिती डबघाईला आल्याने ठेवीदारांचे पैसे परत करण्यास आणि दैनंदिन व्यवसाय चालण्यास असमर्थ ठरलेल्या गोव्यातील दि मडगाव अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचा बँकिंग परवाना आज रिझर्व्ह बँकेने रद्द केला. बँकेतील ठेवीदारांना डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून विमा भरपाई दिली जाणार असल्याचे आरबीआयने म्हटलं आहे.

डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन अंर्तगत दि मडगाव अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचे ९९ टक्के ठेवीदार विमा भापाईसाठी पात्र आहेत. या योजनेअंतगर्त पाच लाखांपर्यंत विमा भरपाई दिली जाणार आहे.
दरम्यान, बुधवारी मोदी मंत्रिमंडळाने ठेवीदार विम्यासंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे.

Advertisement

मंत्रिमंडळ बैठकीत डिपॉझिट विमा आणि पत हमी महामंडळ म्हणजेच डीआयसीजीसी कायदा 1961 मधील दुरुस्तीस मान्यता देण्यात आली. त्याअंतर्गत बँक बुडल्यास किंवा बँक बंद झाल्यास ठेवीदारांना 90 दिवसांच्या आत पैसे मिळतील. ही जास्तीत जास्त रक्कम 5 लाख रुपये असणार आहे. त्यामुळे बँक जरी बंद झाली तरी ग्राहकांचा पैसा सुरक्षित राहणार आहे.

दरम्यान, सदर बँकेवर लवकरच लिक्विडेटर (अवसायक) नियुक्त केला जाणार आहे. बँकिंग नियमन कायदा १९४९ च्या अनेक तरतुदींचे दि मडगाव अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेने उल्लंघन केले होते. बँकेकडे पुरे भांडवल देखील नव्हते.

मागील काही वर्ष बँक रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधामध्ये होती. सध्या परिस्थिती ठेवीदारांचे पैसे परत करण्यात अपयशी ठरल्याने बँक कायमस्वरूपी बंद करणे हिताचे आहे, असे रिझर्व्ह बँकेने आपल्या निवेदनात म्हटलेल आहे.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker