Mhlive24 टीम, 13 जानेवारी 2021:–सध्या भारत देश हा व्यावसायिक दृष्ट्या इतर देशांसाठी तसेच कंपन्यांसाठी एक स्वस्त आणि मस्त बाजारपेठ म्हणून समोर येत आहे. अनेक देश तसेच कंपन्यांनी आता भारतात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे.
महाराष्ट्रामध्ये आताच १० हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. Apple ने चेन्नई मधून आपला प्लांट चीन मधून शिफ्ट केला आहे.
लवकरच आता इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी Tesla ने अखेर भारतात एन्ट्री केली आहे. एलन मस्क हे Tesla चे संस्थापक आहेत.
एलन मस्क यांच्या टेस्ला कंपनी ने ‘टेस्ला मोटर्स इंडिया अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड'(Tesla Motors India And Energy PVT Ltd with RoC Banglore) नावाने भारतात रजिस्ट्रेशन केलं आहे. कंपनी भारतात लग्झरी इलेक्ट्रिक वाहनांच उत्पादन होईल.
भारतचे आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंगळुरू मधून tesla आपल्या व्यवसायाला सुरुवात करणार आहे. या सोबतच कंपनी ने तीन डायरेक्टर्स हि नियुक्त केले आहेत.
वैभव तनेजा,वेंकटरंगम श्रीराम आणि डेव्हिड जॉन फेस्टीन यांची डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ८ जानेवारी रोजी कंपनी ने नोंदणी केली असून नोंदणी नंबर १४२९७५ आहे.