Fill ITR and win bullet : इन्कम टॅक्स रिटर्न भरा अन बुलेट जिंका; ऑफर 31 डिसेंबरपर्यंत, जाणून घ्या डिटेल

MHLive24 टीम, 26 डिसेंबर 2021 :- अनेकांची आयटीआर भरण्यासाठी धावपळ सुरु आहे. इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच ITR भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे. याआधी आयटीआर भरणे आवश्यक आहे, जर तसे केले नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल.(Fill ITR and win bullet)

दरम्यान, कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) ने एक अनोखी ऑफर सुरू केली आहे ज्यामध्ये गाव पातळीवरील उद्योजकांना रॉयल एनफिल्ड बुलेट जिंकण्याची संधी मिळत आहे.

ऑफरमध्ये सहभागी होण्यासाठी, VLE ला 31 डिसेंबर 2021 पूर्वी रु. 1000 पेक्षा जास्त आयकर रिटर्न (ITR) भरावे लागतील.

Advertisement

कॉमन सर्व्हिस सेंटरच्या ट्विटर अकाऊंटवर दिलेल्या माहितीनुसार, VLEs 1 लाख रुपयांपर्यंतचे कमिशन देखील जिंकू शकतात. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, 4 कोटींहून अधिक करदात्यांनी आयकर रिटर्न भरले आहेत. FY 2021 साठी ITR भरण्याची प्रक्रिया जलद करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.

21 डिसेंबरपर्यंत गेल्या सात दिवसांत 46.77 लाखांहून अधिक रिटर्न भरण्यात आल्याचे विभागाने म्हटले आहे. 21 डिसेंबर रोजी 8.7 लाख रिटर्न भरले गेल्याचेही विभागाने नुकतेच उघड केले आहे.

VLEs काय आहेत

Advertisement

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भारतातील सेवा केंद्रांचे व्यवस्थापन करते. CSC चे उद्दिष्ट देशाच्या कानाकोपऱ्यात इंटरनेटशी संबंधित सेवा प्रदान करणे आहे. CSCs त्यांच्या गावांमध्ये कार्ये करण्यासाठी ग्रामस्तरीय उद्योजक (VLEs) नियुक्त करतात.

मुदत वाढू शकते

ITR भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 आहे. पण काही मीडिया रिपोर्ट्सनुसार ही मुदत आणखी वाढवलई जाऊ शकते. या आर्थिक वर्षात अपेक्षेपेक्षा कमी आयटीआर दाखल होणे हे त्याचे कारण आहे.

Advertisement

प्राप्तिकर विभागाच्या म्हणण्यानुसार, 23 डिसेंबरपर्यंत एकूण 4,20,29,919 ITR दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी 10,96,557 ITR फक्त 23 डिसेंबर रोजीच दाखल झाले आहेत. हे आकडे गेल्या वर्षीच्या आकड्यांपेक्षा कमी आहेत.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker