Mhlive24 टीम, 18 ऑक्टोबर 2020 :- कंगना राणावत विरोधात एफआयआर दाखल करा, असे आदेश वांद्रे कोर्टाने पोलिसांना दिले होते. धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा कंगनावर आरोप आहे.

आज कंगना राणावत आणि तिची बहिण रंगोली चांडेल विरोधात मुंबईच्या वांद्रे पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.१२४ अ सह विविध कलमांतर्गत कंगना विरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहे.

कास्टिंग डायरेक्टर साहिल अशरफ सय्यदयांच्या तक्रारीनंतर वांद्रे न्यायालयाने कंगना आणि तिच्या बहिणीविरूद्ध एफआयआर नोंदविण्याचे आदेश दिले होते. हे सर्व कलम अजामीनपात्र आहेत, असे साहिलचे वकील रवीश जमींदार यांनी सांगितले.

आज कोर्टाकडून आदेश मिळाल्यानंतर फिर्यादी व त्याचा वकील कोर्टाच्या आदेशाची प्रत घेऊन वांद्रे पोलिस ठाण्यात पोहोचले. एफआयआरनुसार कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांनी आपल्या ट्वीटद्वारे जातीय सलोखा बिघडविण्याची आणि महाराष्ट्र सरकारच्या

नावाची बदनामी करण्याचे काम केले आहे. कंगनाविरोधात वांद्रे कोर्टात दोघा व्यक्तींनी याचिका दाखल केली होती. कंगना बॉलिवूडमधील हिंदू आणि मुस्लीम कलाकारांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे.

याचिकाकर्त्यांनी कोर्टात कंगनाचे काही ट्विट्स आणि तिच्या वक्तव्याचे व्हिडिओ सादर केले आहेत. त्यानंतर कोर्टाने कलम १५६ (३) अंतर्गत कंगना विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology