गिर्यारोहण व्यवसाय बंद पडण्याची भीती

MHLive24 टीम, 28 जुलै 2021 :-  कोरोनाच्या निर्बंधाचा परिणाम वेगवेगळ्या क्षेत्रांप्रमाणे पर्यटनस्थळांसह गिर्यारोहणावरही झाला आहे. पुढील काही दिवसांत कायदेशीररीत्या परवानगी न मिळाल्यास गिर्यारोहण व्यवसाय बंद करावा लागेल, अशी चिंता गिर्यारोहकांना सतावत आहे.

अधिकृत गिर्यारोहक संस्था व्हेंटिलेटरवर :- कोरोनामुळे पर्यटनस्थळांसह गिर्यारोहणासाठी बंदी आहे, तरीसुद्धा अनेकजण गिर्यारोहण व पर्यटनस्थळी गर्दी करत आहेत; मात्र त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. दुसरीकडे कायद्याचे पालन करणारे गिर्यारोहक घरी बसून असून त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे त्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. परिणामी, अधिकृत गिर्यारोहक संस्था व्हेंटिलेटरवर आहेत.

बेकायदेशीरला अभय आणि कायदेशीरचे मरण :- कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता अनेकजण गिर्यारोहणासाठी बाहेर पडत आहेत. तसेच, काही संघ लोकांना घेऊन विविध ठिकाणी जात आहेत. अशात त्यांचा अपघात झाल्यास जबाबदारी कोण घेणार?

Advertisement

जर अशा लोकांवर कारवाई होणार नसेल तर आमच्यासारख्या प्रामाणिक गिर्यारोहक संस्थांना कायदेशीररीत्या परवानगी द्यावी, अशी मागणी विविध गिर्यारोहक संघांनी केली आहे.

बारमध्ये शंभर चालतात, तर किल्ल्यांवर पन्नास जणांना बंदी का ? :- बिअरबारमध्ये १०० जण सोबत बसू शकतात; मग आमच्यासारखे कायद्याने चालणारे ५० गिर्यारोहक गड-किल्ल्यांवर का जाऊ शकत नाही? सरकारने गिर्यारोहणासाठी परवानगी देणे गरजेचे आहे.

ती देताना त्याची एक प्रत वनविभाग, तेथील ग्रामस्थ व पोलिसांना द्यावी. त्यामुळे कोणीही त्रास देणार नाही. सध्या बहुतांश ठिकाणी लपूनछपून सुरू असलेले पर्यटन बंद करावे किंवा सरकारने ठरवलेल्या नियमांचे पालन करून सर्वांना परवानगी द्यावी, अशी या संस्थांची मागणी आहे.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker