Gift to farmers : नवीन वर्षाच्या आधीच शेतकऱ्यांना मिळणार गिफ्ट ! सरकारची तयारी पूर्ण, जाणून घ्या ताजे अपडेट

MHLive24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :- आता अवघ्या काही दिवसांत २०२१ हे साल संपेल. परंतु आता हा वर्षाचा शेवटचा महिना अर्थात डिसेंबर हा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आला आहे. अनेक दिवसांपासून 10 व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये येणार आहेत.(Gift to farmers)

या योजनेंतर्गत आतापर्यंत 9 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठविण्यात आले आहेत. 15 डिसेंबरपर्यंत सरकार 10व्या हप्त्याचे पैसे पाठवू शकते.

डिसेंबरमध्ये शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट

Advertisement

शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती आणि त्यांचे उत्पन्न सुधारण्यासाठी केंद्र सरकार दरवर्षी 6000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवते . आत्तापर्यंत पीएम किसान सन्मान योजनेच्या 9 हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात आले आहेत. आता पुढील म्हणजेच दहाव्या हप्त्याचे पैसे पुढील महिन्यात येणार आहेत.

या योजनेचा उद्देश काय आहे

देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना थेट आर्थिक मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे. पुढील हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना येत्या महिनाभरात पुन्हा आनंदाची बातमी मिळणार आहे. जर तुम्हीही यासाठी अर्ज केला असेल तर तुम्ही या यादीत तुमचे नाव तपासू शकता.

Advertisement

तुमच्या हप्त्याचा स्‍टेटस असा तपासा

1. तुमच्या हप्त्याचा स्‍टेटस पाहण्यासाठी, तुम्ही प्रथम वेबसाइटवर जा.
2. यानंतर उजव्या बाजूला Farmers Corner वर क्लिक करा.
3. आता बेनेफिशियरी स्‍टेटस ऑप्शनवर क्लिक करा.
4. आता तुमच्यासोबत एक नवीन पेज उघडेल.
5. येथे तुम्ही तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक टाका.
6. यानंतर तुम्हाला तुमच्या स्टेटसची संपूर्ण माहिती मिळेल.

 

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker