Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

शेतक-यांना मिळणार बाजारभावाच्या पाचपट दाम

0 3

MHLive24 टीम, 28 जून 2021 :-  पुण्यातील रिंगरोडसाठी भूसंपादन करण्यात येणा-या जमिनीला बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्यावर शिक्कामोर्तब झाले असून, जिल्हाधिकारी डाॅ राजेश देशमुख त्याची घोषणा करणार आहेत.

समृद्धी महामार्गाप्रमाणे भरपाई महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) पुणे जिल्ह्यात १७३.७२ किलोमीटर लांबीचा रिंगरोड तयार करत आहे.

Advertisement

यासाठी १५८५.४७ हेक्टर जमिनीचे भूसंपादन होणाऱ्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना ”समृद्धी महामार्ग”प्रमाणे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

८१ गावांतून जाणार रिंगरोड पुणे शहर आणि लगतच्या पाच तालुक्यांतील ८१ गावांतून रिंगरोड जाणार आहे. पूर्व भागातील ४६ गावे, तर पश्चिम भागातील ३८ गावांचा समावेश आहे. या रिंगरोडचा बांधकाम खर्च १७ हजार ७२३.६१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

Advertisement

जर हा रिंगरोड बांधा, वापरा, हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर राबविल्यास २६ हजार ८१८.८४ कोटी रुपये खर्च येणार आहे.

१५८५.४७ हेक्टरपैकी १३६ हेक्टर वनजमिनीचा वळतीकरणाचा प्रस्ताव वनविभागाकडे दाखल करण्यात आला आहे. या वनजमिनीची तपासणी तसेच मोजणी प्रक्रिया सुरू आहे.

Advertisement

प्रकल्पाची तांत्रिक बाजू… रिंगरोडचा हा प्रकल्प आय. आर. सी एसपी-99-2013 (मॅन्युअल ऑफ स्पेसिफिकेशन अँड स्टँडर्ड फॉर एक्सप्रेस वे) नुसार सल्लागाराने तयार केला आहे.

द्रुतगती महामार्गाच्या मानांकानुसार १२० किलोमीटर प्रतितास या वेगासाठी ही नवीन लांबी विकसित करण्याचे प्रस्तावित आहे.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup