‘ह्या’ सुपरस्टारच्या फॅन्सकडून राम गोपाल वर्मांच्या ऑफिसवर दगडफेक

MhLive24 टीम , 26 जुलै  2020 :- साऊथ सुपरस्टार पवन कल्याण याच्या आयुष्यावर सिनेमा तयार केल्यानं राम गोपाल वर्मा पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. पवन कल्याणच्या या सिनेमावरून त्याचे चाहते वर्मांवर भडकले असून त्यांनी त्याच्या कार्यालयावर दगडफेक केली आहे.

आणि त्यांनी तुफान राडा घातला आहे. बॉलिवूड चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनी पवन कल्याणच्या आयुष्यावर वर्मा यांनी ‘पावर स्टार’ हा चित्रपट तयार केला.

या चित्रपटात चुकीच्या पद्धतीने पवन कल्याणचं आयुष्य दाखविल्याचा त्याच्या फॅन्सचा आरोप आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांचे फॅन्स चांगलेच भडकले आणि त्यांनी चक्क राम गोपाल वर्मांच्या ऑफिसवरच हल्ला केला.

Advertisement

या हल्ल्याची तक्रार राम गोपाल वर्मा यांनी ज्युबली हिल्स पोलिसांकडे केली आहे. त्यानंतर तपास करून पोलिसांनी 6 जणांना अटक केली.

या वादावर वर्मा यांनी ट्विट करून माहितीही दिली आहे. या चित्रपटानंतर मला सातत्याने धमक्या येत आहेत. तसं धमक्यांची आणि त्या वातावरणात राहण्याची मला सवय आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement

Mhlive24.com वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा mhlive24@gmail.com वर

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker