खंडणी प्रकरणात या प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक !

MHLive24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- बेकायदेशीर आर्थिक व्यवहार आणि अफरातफर प्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्री लिना मारिया पॉलला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं ही अटक केली आहे.(Famous actress Lina Maria Paul arrested)

200 कोटींच्या खंडणीच्या प्रकरणात तिला अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या फसवणुकीच्या प्रकरणात सुकेश सोबत त्याची पत्नी आणि चित्रपट अभिनेत्री लीना पॉल होती.

शिविंदर सिंगची पत्नी अदितीनंतर, मालविंदरची पत्नी जापना सिंगनेही आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दिली, ज्यात तिने सांगितले की तिच्या पतीला जामीन मिळवून देण्याच्या नावाखाली तिच्याकडून कोट्यवधी रुपये उकळले आहेत.

Advertisement

तक्रारीमध्ये जपना सिंग यांनी म्हटले आहे की, फोन करणारा एक वरिष्ठ सरकारी अधिकारी आहे आणि त्याने मालविंदर सिंगला जामिनावर तुरुंगातून बाहेर येण्यास मदत करण्याची ऑफर दिली आहे. त्या बदल्यात हाँगकाँगमधील एका बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले होते.

फोन करणाऱ्याने हे पैसे काही पार्टी फंडात देण्याचे सांगितले आणि त्या बदल्यात तिच्या पतीला जामिनावर तुरुंगातून बाहेर काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर जापना सिंग यांनी त्या बँक खात्यात 3.5 कोटी रुपये जमा केले होते.

याआधीही सुकेश चंद्रशेखरने मालविंदरचा भाऊ शिविंदरच्या पत्नीला असाच फोन केला होता आणि जामीन मिळवण्याच्या नावाखाली 200 कोटी रुपये गोळा केले होते.

Advertisement

लिना ही सुकेश चंद्रशेखर याची पत्नी आहे. सुकेश चंद्रशेखर याला यापूर्वीच 200 कोटींच्या अफरातफऱ प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या प्रकऱणात लिनादेखील सहभागी असल्याचे पुरावे मिळाल्यामुळे पोलिसांनी तिला अटक केली.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker