Face Care Tips : चेहऱ्याचा रंग बदलून टाकेल ‘हा’ बेसन अन कोरफडीचा फेसपॅक; कसा बनवायचा?कसा वापरायचा? पहा…

MHLive24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- बहुतेक लोक आपली त्वचा चमकदार करण्यासाठी बाजारात उपलब्ध अनेक प्रकारची उत्पादने वापरतात. त्वचेच्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, बाजारात मिळणाऱ्या केमिकलयुक्त पदार्थांच्या वापरामुळे काही वेळा त्वचेवर जळजळ होते, त्यामुळे त्वचेवर जळजळ आणि खाज येण्याची समस्या सुरू होते.(Face Care Tips )

अशा परिस्थितीत तुम्ही घर बसल्या बेसनचा फेस पॅक तयार करू शकता. याच्या मदतीने तुम्हाला तजेलदार चेहरा सहज मिळू शकतो.

हा फेस पॅक कोरफड, गुलाबपाणी आणि बेसनापासून तयार केला जातो. चला तर मग ते कसे बनवायचे आणि त्याचे जबरदस्त फायदे जाणून घेऊयात,,,

Advertisement

कोरफड आणि बेसन हे दोन्ही त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. कोरफड त्वचेची स्वच्छता करते आणि टॅनिंग काढून टाकण्यास देखील मदत करते. त्याच बरोबर बेसनामुळे चेहऱ्याचा काळसर रंगही उजळू लागतो.

कोरफड आणि बेसन यांचा फेस पॅक कसा बनवायचा ?

यासाठी बेसन आणि गुलाबपाणी, कोरफडीची गरज लागेल
सर्वप्रथम कोरफडीच्या पानांमधून त्याचा लगदा काढा.
आता एका भांड्यात 4 चमचे कोरफडीचा पल्प टाका.
त्यात 2 चमचे बेसन घालावे
आता 1 चमचे गुलाबजल टाका.
हे तिन्ही चांगले मिसळा.
पेस्ट तयार होईपर्यंत मिसळा
आता संपूर्ण चेहरा आणि मानेवर लावा.
15 मिनिटांनंतर स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवा.
सर्वोत्तम परिणामांसाठी तुम्ही हा फेस पॅक आठवड्यातून 1-2 वेळा वापरू शकता.

Advertisement

अशा पद्धतीने देखील वापरू शकता

हा फेस पॅक तुम्ही बाटलीत किंवा कंटेनरमध्ये ठेवू शकता.
त्यानंतर तुम्ही दररोज सकाळी याने चेहरा स्वच्छ करू शकता.
यासाठी ही पेस्ट बोटांवर लावा.
याने चेहऱ्याला मसाज करा.
५ मिनिटांनी चेहरा ताज्या पाण्याने नीट धुवा.
असे रोज केल्याने तुमच्या त्वचेवर नैसर्गिक चमक येईल.
त्वचेचा रंगही सुधारेल.

या फेस पॅकचे जबरदस्त लाभ

Advertisement

पुरळ घालवतात
त्वचाचा रंग उजळ करतात
त्वचा मॉयश्चराइज होते
त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार बनवा

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker