रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; नियमांत झालाय तुमच्या फायद्याचा ‘हा’ बदल

MHLive24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- रेशन कार्ड हे अत्यंत महत्वाचे दस्तऐवज आहे. आज प्रत्येक भारतीयांकडे एक महत्वाचे डॉक्युमेंट झाले आहे. परंतु आता या लोकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. यात नियमांत महत्वपूर्ण बदल झाला आहे.

आता दिल्ली सरकारने रेशन कार्ड धारकांसाठीचे नियम बदललेत, ज्याचा फायदा या कार्डधारकांना होणार आहे. या नियमांचा लाभ त्या लोकांना मिळणार आहे, जे मोफत रेशन दुकानात जाऊन त्यांचे हक्काचे धान्य वगैरे आणू शकत नाहीत. आता हे लोक रेशन दुकानात न जाता त्यांचे रेशन मिळवू शकतील. सरकारने नियमांमध्ये कोणते बदल केलेत आणि लोकांना त्याचा कसा फायदा होणार आहे ते जाणून घ्या.

रेशन कार्ड असूनही रेशन दुकानात सरकारी योजनेतून मिळणारं मोफत धान्य गरीबांना मिळत नाही. तर काहींना रेशन कार्ड असूनही रेशन दुकानापर्यंत पोहोचता येत नाही. अशा नागरिकांसाठी एक खास योजना आणण्यात आली आहे.

Advertisement

दिल्ली सरकारनं रेशन दुकानात मिळणाऱ्या धान्याच्या प्रक्रियेत काही बदल केले आहेत. नव्या नियमानुसार जे व्यक्ती वैद्यकीय कारणामुळे किंवा वयामुळे रेशन घेण्यासाठी दुकानापर्यंत पोहोचू शकत नाहीत ते यासाठी दुसऱ्या व्यक्तीला यासाठी नामांकित करू शकणार आहेत.

नामांकित करण्यात आलेली व्यक्ती अशा व्यक्तींचं धान्य रेशन दुकानातून आणू शकते. रेशन दुकानामध्ये धान्य आणण्यासाठी कार्ड धारकाला बायोमेट्रिकवर बोटांचे ठसे द्यावे लागतात. त्यानंतरच धान्य दिलं जातं.

नव्या नियमानुसार अशा कुटुंबांना दुसऱ्या व्यक्तीला रेशन दुकानावरुन धान्य घेण्यासाठी नामांकित करता येणार आहे. संबंधित व्यक्ती या कुटुंबासाठी धान्य घेऊ शकणार आहे. पण नामांकित केलं जाणाऱ्या व्यक्तीकडे आधारकार्ड असणं गरजेचं असणार आहे.

Advertisement

यासाठी रेशनकार्ड धारकाला एक फॉर्म भरावा लागणार आहे. यासोबत रेशन कार्ड आणि आधार कार्ड सोबत जोडावे लागणार आहे. तसंच नामांकित केल्या गेल्या व्यक्तीचीही कागदपत्रं सादर करावी लागतील. त्यानंतर नामांकित करण्यात आलेला व्यक्ती रेशन दुकानात जाऊन धान्याची खरेदी करू शकणार आहे.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker