बनावट प्रस्तावाद्वारे १८०० कोटींचे निर्यात अनुदान लाटले, दोन उद्योजकांना बेड्या

MHLive24 टीम, 31 जुलै 2021 :-  बनावट निर्यात प्रोत्साहन देयके मिळविणाऱ्या टोळीच्या करामती महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) उजेडात आणल्या आहेत. हा १८०० कोटी रुपयांचा घोटाळा असून, त्याचे लागेबांधे मुंबईसह दिल्ली व सूरत शहरांशीही असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी डीआरआयने केलेल्या तपासानुसार, राजन सारंग व प्रशांत मोडक, या दोन उद्योजकांना डीआरआयने अटक केली.

दोघांच्या 124 बनावट कंपन्या :- सारंग आणि मोडक हे दोघेही १२४ बनावट कंपन्यांच्या माध्यमातून निर्यात प्रोत्साहन भत्त्याची चोरी करीत होते. या कंपन्यांना निर्यात केल्याचे दाखवून त्याची खोटी देयके सरकारकडे जमा करीत होते. त्याआधारे निर्यात भत्ता मिळवत असत. डीआरआयला याबाबत माहिती मिळाल्यानंतर पथकाने सारंग याच्या घरावर छापा टाकला.

दिल्ली, सुरतपर्यंत व्याप्ती :- या छाप्यावेळी, ४२.९० कोटी रुपयांची बनावट देयके या दोघांनी प्रशासनकडे पाठवली होती, असे दिसून आले. तसेच २२ कोटी रुपयांची देयके तयार होत होती. त्याआधारे या दोघांना ताब्यात घेण्यात आले.

Advertisement

तपासावेळी एक बेकायदेशीर पिस्तुलदेखील डीआरआयने ताब्यात घेतले. हा संपूर्ण घोटाळा १८०० कोटी रुपयांचा असून, ही एक टोळी आहे. टोळीतील अन्य सदस्य दिल्ली व सुरत या शहरांमध्ये असल्याचे डीआरआयमधील सूत्रांनी सांगितले.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker