MG Motor : सप्लाई चेन समस्यांमुळे एमजी मोटर इंडियाला (MG Motor) ऑगस्टमध्ये (August) विक्रीत (sales) 11 टक्क्यांनी घट झाली.

ऑगस्ट 2021 मध्ये 4,315 वाहनांच्या तुलनेत गेल्या महिन्यात कंपनी केवळ 3,823 वाहने विकू शकली आहे. त्यामुळे सध्या मार्केटमध्ये अनेक चर्चांना उधाण आले आहे.

कंपनीने याबद्दल सांगितले की, “सप्लाई चेन मधील अस्थिरता अनेक उत्पादन आव्हानांचे कारण आहे, तथापि, पुढील महिन्यापासून त्यात सुधारणा अपेक्षित आहे.”

चीनच्या SAIC मोटर कॉर्पोरेशनच्या (SAIC Motor Corp) संपूर्ण मालकीच्या कंपनीने सांगितले की, काही काळानंतर वाहने लॉन्च करण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन असलेल्या वाहनांची चांगली ऑर्डर बुकिंग आहे.

सेफ्टी, स्टाइल आणि एडवांस टेक्नोलॉजीसह ग्लोस्टरचे नवीन मॉडेल बाजारात आणल्यानंतर विक्री दुप्पट होण्याची अपेक्षा आहे.

एमजी मोटर इंडियाने सांगितले की नेक्सट जनरेशन हेक्टर (next generation Hector) वर्षाच्या अखेरीस लाँच केले जाणार आहे आणि या वाहनामुळे कंपनीला विक्रीत सुधारणा होण्याची खूप अपेक्षा आहे.