MHLive24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- जेवण झाल्यानंतर ढेकर येणं म्हणजे अन्न व्यवस्थित पचलं आहे, असं मानलं जातं, पण सतत ढेकर येणं हे एका आरोग्य समस्येचं लक्षण असू शकतं. ढेकर येण्याची कारणं काय, लक्षात घेऊ. . .(Excessive belching is a health problem)

सतत ढेकर येणं आरोग्याच्या दृष्टीने योग्य मानलं जात नाही. कारण अनेकदा अशाप्रकारे ढेकर येणं हे एखाद्या आजाराचं लक्षण असू शकतं. यामुळे असिड रिफ्लेक्स, अँसिडिटी आणि अनेक गंभीर समस्या होऊ शकतात. म्हणून ढेकर येण्यास सामान्य समजू नका. लक्षात घ्या, ढेकर काय संकेत देत आहेत.

ढेकर का येतात ? : – जेव्हा एकत्रित वायू पोटातून अन्न नलिकेत येतो, तेव्हा एक प्रकारचे कंपन होते. जे गाल आणि तोंडातून बाहेर पडताना आवाज करते. जेव्हा पोटातील वायू बाहेर पडताना कंपन करत  नाही, तेव्हा आवाज येत नाही.

कारणं अनेक 

काही व्यक्तींमध्ये जेव्हा पोटात अल्सर होतो, तेव्हा त्यामुळे सतत ढेकर येतात. अशा स्थितीत छातीत जळजळ होऊ शकते.

छोट्या आतड्यात बॅक्टेरिया वाढण्यामुळे सतत ढेकर येण्याची समस्या सुरू होते. बॅक्टेरिया होण्याने ड्यूडेनम छोट्या आतड्याचा भागही प्रभावित होतो. ज्यामुळे सतत ढेकर येण्याची समस्या सुरू होते. अशावेळेस डॉक्टरांकडून पोटाची तपासणी वेळोवेळी करा.

काही व्यक्ती खूप भरभर खातात किंवा खूप मोठे घास गिळतात. याचा परिणाम पचनावर होतो.

खाताना किंवा जांभई देताना जेव्हा आपण तोंड उघडतो, तेव्हा हवा पोटात जाते. काही वेळेस यामुळेही ढेकर येतात.

पोट खराब होण्याच्या समस्येमुळे पोटात गॅस तयार होतात. पचनक्रियेत सहभागी होणार्‍या पोटातील बॅक्टेरियांचं संतुलन बिघडण्याने ही समस्या निर्माण होते.
त्यामुळे ढेकर येतात.

पोट रिकामं असल्यास पोटातील रिकाम्या जागेत हवा भरते. ही हवा ढेकरांच्या माध्यमातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते.

कार्बोनेटेड ड्रिंक्स, जंक फूड, कोबी, मटार, डाळी यांसारखे अनेक पदार्थ आहेत, जे पोटात गॅस बनवतात. असे पदार्थ खाल्ल्यानंतर जास्त ढेकर येतात.

धूम्रपान करणार्‍या व्यक्‍ती सिगरेटच्या धुराबरोबर खूप सारी हवा आत खेचतात. ही हवा ढेकराच्या माध्यमातून बाहेर पडते.

कधी कधी काही व्यक्‍ती तणावामुळे खूप जास्त प्रमाणात खातात. यामुळेही सतत ढेकर येतात.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology