आयसीआयसीआय बँकेवर माजी व्यवस्थापकाचाच दरोडा, महिला ठार

MHLive24 टीम, 30 जुलै 2021 :- विरारमध्ये सशस्त्र हल्ला करीत आयसीआयसीआय बँकेवर दरोडा टाकण्यात आला. विरार पूर्व स्टेशन परिसरातील आयसीआयसीआय बँकेत गुरूवारी रात्री आठ वाजता ही घटना घडल्यानं खळबळ उडाली. दरोडेखोरांच्या हल्ल्यात एक महिला कर्मचारी गंभीर जखमी झाल्या असून एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

दरोडेखोराला नागरिकांनी पकडले :- दोन दरोडेखोरांनी हा सशस्त्र दरोडा टाकला. सोने आणि पैशाची बॅग घेऊन फरार होत असताना एका दरोडेखोराला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. जो दरोडेखोर पकडलेला आहे, तो दरोडेखोर याच बँकेत पूर्वी मॅनेजर असल्याचीही माहिती आहे.

सहायक व्यवस्थापक ठार :- दरोडेखोरांच्या हल्ल्यात सहायक व्यवस्थापक महिलेचा मृत्यू झाला. योगिता वर्तक-चौधरी असं मृत्यू झालेल्या महिलेचा अधिका-याचं नाव आहे, तर श्रद्धा देवरुखकर असं जखमी झालेल्या महिला कर्माचा-याचं नाव आहे. पोलिसांनी हल्ल्यात जखमी झालेल्या महिला कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल केलं. श्रद्धा देवरुखकर या महिलेवर उपचार सुरू आहेत.

Advertisement

दरोड्याचं कारण :- दोन दरोडेखोरांनी आयसीआयसीआय बँकेच्या विरार येथील शाखेवर दरोडा टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. दरोडेखोर सोने आणि पैशाची बॅग घेऊन फरार होत असाताना एका दरोडेखोराला नागरिकांनी शिताफीनं पकडलं. एका दरोडेखोराला पोलिसांनी अटक केली आहे.

विरार पोलिसांकडून तपास सुरू :- नागरिकांनी मोठं धाडस दाखवत दरोडेखोर व्यक्तीला पकडून ठेवलं होतं. दरोडेखोर व्यक्ती हा बँकेचा पूर्वीचा कर्मचारी असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे या घटनेमागील कारणाचा शोध घेण्यासाठी विरार पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker