थोडीशी जमीनही देईल तुम्हाला लाखोंची कमाई; ‘असे’ करा प्लॅनिंग

MHLive24 टीम, 27 जुलै 2021 :- ग्रामीण भागामध्ये जर तुमच्याकडे थोडीशी का होईना जमीन असेल तर तुम्हाला खूप चांगला असा युनिक आयडिया वापरात चांगली कमाई करता येईल. आज आपण जाणून घेऊयात की सीताफळाच्या लागवडीतून कशा पद्धतीने बक्कळ कमाई करता येईल याविषयी.

भारतातील आंध्र प्रदेश कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र या राज्यांमध्ये सिताफळाची लागवड केली जाते. महाराष्ट्र सिताफळाच्या लागवडीत प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्रामध्ये जळगाव, दौलताबाद, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, यवतमाळ, वर्धा इत्यादी भागात सिताफळाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. सिता फळाचे औषधे आणि आयुर्वेदिक गुणधर्म मोलाचे आहेत.

सीताफळामधून दोघं बंधूंची कमाई :- औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात वडवाळी हे राम आणि शाम काळे यांचे गाव. जायकवाडी धरणामुळे अख्ख्या मराठवाड्याला फायदा झाला असला तरी पैठण तालुक्यातील अनेक गावे तहानलेली असतात. मोसंबीचा पट्टा असलेला हा भाग चार-पाच वर्षांपासून दुष्काळाने होरपळत होता.

Advertisement

त्यामुळे शेतकरी फळबाग लागवड करायला कचरत होते. याच काळात वडवाळी येथील राम व श्याम काळे यांनी कमी पाण्यात येत असलेल्या सीताफळ बागेची एका एकरात लागवड केली. काळे बंधूंनी पारंपरिक पिकाला फाटा देत तीन एकरावर टप्प्याटप्प्याने सीताफळ बाग उभी केली. यापूर्वी ते आपल्या शेतीत तूर, मूग, उडीद, ज्वारी, सोयाबीन ही पिके घ्यायचे. मात्र, या पिकांच्या उत्पादनातून खर्च जाता फारसे काही उत्पन्न शिल्लक राहत नव्हते.

काळे यांनी सुपर गोल्डन या सीताफळ वाणाची निवड केली. रोपे लागवडीपासून तिसऱ्या वर्षीच फळे लगडण्यास सुरवात झाली. आता दुसऱ्यादा तोडणी केलेल्या फळाचे वजन जवळपास ७५० ग्रामपर्यंत भरले. ही फळे दिसायला आकर्षक असून बिया कमी आणि गर अधिक आहे. यातून ते एकरी साडेचार लाख रुपयांची कमाई करतात.

अशी करा लागवड :- सीताफळाच्या लागवडीसाठी पावसाळ्यापूर्वी मे महिन्यात ०.६० बाय०.६० बाय आकाराचे खड्डे जमिनीचा मगदूर पाहून खोदावेत. ते पाच बाय पाच मीटर अंतरावर खड्डे घ्यावेत. म्हणजे या अंतराने खड्डे केल्यास एक हेक्टर मध्ये ४०० झाडे बसतात आणि लागवड ४ बाय ४ मीटर वर केल्यास ५० टक्के अधिक झाडे बसतात.

Advertisement

चांगल्या प्रकारचे शेणखत, सिंगल सुपर फास्फेट, पोयटा माती सह पावसाळ्यापूर्वी खड्डे भरून घ्यावेत. बांगडी पद्धतीने थायमेट १० जि वापरावे. यासाठी हेक्टरी अर्धा टन शेणखत, २०० किलो सिंगल सुपर फास्फेट ची हेक्टरी आवश्यकता असते. अशाप्रकारे खड्डे भरल्यानंतर जुलै-ऑगस्टमध्ये पावसाळ्यात झाडांची लागवड सुरू करावी.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker