अकरावी प्रवेश परीक्षा यादीत घोळ

MHLive24 टीम, 28 जुलै 2021 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे अकरावी प्रवेश पूर्व परीक्षेसाठी पुणे पूर्व आणि पुणे पश्चिम भागातील परिसरांची यादी परिपत्रकांद्वारे संकेतस्थळावर प्रसिद्ध केली; परंतु त्यात पूर्व भागांमध्ये पश्चिम भागातील ठिकाणे, तर पश्चिम भागात पूर्वेकडील ठिकाणांचा उल्लेख होता. ही चुक लक्षात आल्यानंतर काही वेळातच पुणे विभागीय मंडळाने त्वरीत दुरूस्ती करून सुधारित यादी परिपत्रकाद्वारे संकेतस्थळावर अपडेट केले; परंतु विद्यार्थी आणि पालकांचा गोंधळ उडाला.

शिक्षण मंडळाचाच गोंधळ :- अकरावी प्रवेशासाठी प्रवेश पूर्व परीक्षा घेतली जाणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरताना परीक्षा केंद्रासाठी परिसराची निवड करावी लागत आहे. यासाठी ऑनलाइन अर्जावर विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रांची यादी प्रसिद्ध करण्यात पुणे विभागीय शिक्षण मंडळाचाच गोंधळ उडाला.

परीक्षेसाठी तीन विभाग :- अकरावी प्रवेशासाठी येत्या २१ ऑगस्ट रोजी राज्यात ‘सीईटी’ घेतली जाणार आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रासाठी परिसर निवडण्याचा पर्याय दिला आहे.

Advertisement

यात पुणे शहरासाठी पुणे पुर्व आणि पुणे पश्चिम अशी विभागणी केली आहे. तर हवेली हा पर्याय ग्रामीण भागातील परीक्षा केंद्राचा परिसर म्हणून दिला आहे. यादील गोंधळामुळे परीक्षा केंद्राचा परिसर निवडण्यात विद्यार्थी-पालकांमध्ये संभ्रम झाला आहे.

छपाई चूक झाल्याची सारवासारव :- ‘‘पुण्यातील परीक्षा केंद्राच्या निवडीसाठी परिसरनिहाय यादीतील चुक ही छपाईतील चुक (प्रिंटिंग मिस्टेक) होती; परंतु ही दुरूस्ती त्वरीत करून सुधारित यादी जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांकडून अर्ज भरताना काही चुका झाल्यास त्या दुरूस्त करण्याची संधी आणि सुविधा दिली जाईल,” अशी माहिती पुणे विभागीय मंडळाचे विभागीय सचिव अनुराधा ओक यांनी दिली.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker