अकरावी शिक्षण झालेल्या ‘त्या’ व्यक्तीने चालवले ‘असे’ डोके, वर्षाला कमावतोय लाखो रुपये

MHLive24 टीम, 27 जुलै 2021 :- मधुमक्षिका पालन हा असा व्यवसाय आहे जो कधीही संपणार नाही. आपल्या आरोग्यासाठी मधु किती फायदेशीर आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे, कारण त्यात अनेक औषधी गुणधर्म आढळतात. हे प्राचीन काळापासून बर्‍याच रोगांमध्ये वापरले जात आहे.

सर्व लोक वेगवेगळ्या पद्धती आणि आवश्यकतानुसार मध वापरतात, म्हणून बाजारात मधांची मोठी मागणी आहे. अशा परिस्थितीत आपण एखादी चांगली व्यवसायाची कल्पना शोधत असाल तर मधुमक्षिका पालन हा व्यवसाय उत्तम आहे.

परन्तु एका व्यक्तीने याही पुढे जाऊन एक भन्नाट प्रयोग राबवला.मधुमक्षिका असणाऱ्या पेट्या भाड्याने देऊन आता तो लाखोंची कमाई करत आहे. जाणून घेऊयात गणेश बुरकुल (वय ३५) यांच्या या कल्पनेविषयी.

Advertisement

हे औरंगाबाद जिल्ह्यातील टाकळी (माळी) येथील रहिवासी आहेत. ते अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांचे शिक्षण अकरावीपर्यंत आहे. त्यांना एक एकर शेती आहे. शेतीमधून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते व इतर रोजगाराची संधी नव्हती. रोजगारासाठी त्यांच्यासमोर मोठा प्रश्‍न होता.

गणेश यांनी मधमाशी पालनाचे प्रशिक्षण पुणे येथून घेतले. प्रशिक्षणानंतर त्यांनी खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मदतीने सुरुवातीला केवळ १० पेट्या आणल्या व शेतात ठेवल्या. त्यामुळे त्यांच्या डाळिंब पिकाचे उत्पादन वाढले. अर्थात, गणेश बुरकूल यांचा आत्मविश्‍वासही वाढला. गणेश यांनी खूप मेहनत घेतली. चिकाटीच्या जोरावर व्यवसायात विकास केला.

औरंगाबाद परिसरातील शेतकऱ्यांना मधमाशांच्या परागीभवनाचे महत्त्व पटवून दिले. डाळिंब, मोसंबी उत्पादन घेणारे बागायतदार परागीभवनासाठी मधपेट्या भाड्याने घेऊ लागले. एक मधपेटीसाठी एका महिन्याला २००० ते २५०० भाडे बागायतदाराकडून मिळू लागले. शिवाय जमा झालेला मध हा जादाची कमाई असते.

Advertisement

एक वर्षात नऊ लाखांचे उत्पन्न :- गणेश बुरकूल हे परागीभवनासाठी मधपेट्या भाड्याने देतात तसेच विक्रीही करतात. याशिवाय मधाची विक्री केली जाते. यातून एका वर्षात नऊ लाखांचे उत्पादन त्यांना मिळते. त्यांनी मधाचा स्वतःचा ब्रँडही तयार केला आहे.

एक किलो मधाची किंमत ५५० रुपये. मधपेट्या वाढविण्याचे तंत्र शिकून त्यांनी जवळ जवळ १८० मधपेट्या वाटल्या. ते एक मधमाशांची पेटी ६००० रुपयांप्रमाणे विकतात. सध्या त्यांच्याकडे ९५ मधमाशांच्या पेट्या उपलब्ध आहेत.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker