Electric Vehicle :पेटोल डिझेलचे वाढते भाव आणि इलेक्ट्रिक वाहनांना आलेलं डिमांड पाहता अनेक ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याचा विचार करतं आहेत.

ग्राहकांचा कल लक्षात घेता कंपण्यानी देखील EV मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. Tata Motors, Mahindra, MG Motors, Hyundai सारख्या प्रमुख कार कंपन्यांनी या विभागात त्यांची उत्पादने लाँच केली आहेत.

दरम्यान टाटा मोटर्स इलेक्ट्रिक व्हेइकल्स (EVs) च्या वाढत्या मागणीमुळे कंपनी उत्पादन वाढवण्याचा विचार करत आहे. टाटा मोटर्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की,

गेल्या दोन महिन्यांत कंपनीला तिच्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी दरमहा सरासरी 5,500-6,000 बुकिंग मिळत आहेत. हे पाहता कंपनी आपल्या इलेक्ट्रिक वाहनाचे उत्पादन वाढवण्याच्या तयारीत आहे.

गेल्या आर्थिक वर्षात, टाटा मोटर्स देशांतर्गत बाजारपेठेतील प्रवासी इलेक्ट्रिक वाहन विभागातील अव्वल खेळाडू आहे. कंपनी देशांतर्गत बाजारात तीन इलेक्ट्रिक वाहने विकते, नेक्सॉन EV, Tigor EV आणि Xpress-T. टाटा मोटर्सने नुकतीच कूप-शैलीची SUV देखील बंद केली, जी पुढील दोन वर्षांत सादर करण्याची त्यांची योजना आहे.

टाटा मोटर्सचे पॅसेंजर व्हेइकल्स आणि इलेक्ट्रिक व्हेइकल्सचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र म्हणाले की, इलेक्ट्रिक वाहनांच्या प्रचंड मागणीमुळे ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स अद्याप प्रलंबित आहेत.

इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीबद्दल चंद्रा म्हणाले, “पुरवठ्यापेक्षा वाहनांची मागणी जास्त आहे, जी आम्ही सध्या पूर्ण करू शकत नाही. कंपनीला गेल्या एक किंवा दोन महिन्यांत दरमहा सरासरी 5,500-6,000 ईव्ही बुकिंग मिळाले आहेत.

तथापि, गेल्या महिन्यात कंपनी मागणीच्या निम्म्या म्हणजे 3,300 ते 3,400 वाहनांचा पुरवठा करू शकली आहे. सेमीकंडक्टरचा पुरवठा वाढवून क्षमता वाढवण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याचे चंद्रा यांनी सांगितले.

FADA नुसार, टाटा मोटर्सने 2021-22 या आर्थिक वर्षात 15,198 इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांची विक्री केली आहे. या सेगमेंटमध्ये कंपनीचा बाजारातील हिस्सा 85.37 टक्के आहे.