Electric Vehicle Rate Hike
Electric Vehicle Rate Hike

MHLive24 टीम, 18 मार्च 2022 :- Electric Vehicle Rate Hike : पेटोल डिझेलचे वाढते भाव आणि इलेक्ट्रिक वाहनांना आलेलं डिमांड पाहता अनेक ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याचा विचार करतं आहेत. ग्राहकांचा कल लक्षात घेता कंपण्यानी देखील EV मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे.

Tata Motors, Mahindra, MG Motors, Hyundai सारख्या प्रमुख कार कंपन्यांनी या विभागात त्यांची उत्पादने लाँच केली आहेत. दरम्यान टाटा Nexon EV सेक्टरमध्ये भरपूर पसंतीची ठरली आहे. परंतु कारच्या किंमतीबाबत मोठी अपडेट येत आहे.

कार निर्माता कंपनी टाटा मोटर्सने त्यांच्या लोकप्रिय SUV Tata Nexon EV च्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने Tata Nexon EV च्या सर्व प्रकारांच्या किंमतीत 25 हजार रुपयांनी वाढ केली आहे. Nexon EV ही सध्या देशात सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार आहे.

हे भारतात पहिल्यांदा जानेवारी 2020 मध्ये लॉन्च करण्यात आले होते आणि तेव्हापासून या EV ची 14000 हून अधिक वाहने विकली गेली आहेत. Tata Nexon EV च्या नवीन किमती रु. 14.54 लाख ते रु. 17.15 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत आहेत.

Tata Nexon EV सध्या XM, XZ+, XZ+ लक्स, XZ+ डार्क एडिशन आणि XZ+ लक्स डार्क एडिशन या पाच प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. सर्व प्रकारांच्या किमतीत 25,000 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, Nexon EV ला इलेक्ट्रिक मोटरसह 30.2kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळतो. पॉवरट्रेन 129 hp ची कमाल पॉवर आणि 245 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते, जो स्वयंचलित ट्रांसमिशनला जोडला जातो.

Nexon EV ची ARAI-प्रमाणित ड्रायव्हिंग रेंज प्रति चार्ज 312 किमी आहे. शिवाय, डीसी फास्ट चार्जरचा वापर करून, ते केवळ 60 मिनिटांत 0 ते 80 टक्के चार्ज करता येते, तर नियमित चार्जर वापरल्यास ते आठ तासांत 20 ते 100 टक्के चार्ज होऊ शकते. Tata Motors या वर्षी Nexon EV ची लाँग रेंज व्हर्जन लॉन्च करण्याचा विचार करत आहे.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit