Electric Car:पेटोल डिझेलचे वाढते भाव आणि इलेक्ट्रिक वाहनांना आलेलं डिमांड पाहता अनेक ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याचा विचार करतं आहेत.

ग्राहकांचा कल लक्षात घेता कंपण्यानी देखील EV मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. Tata Motors, Mahindra, MG Motors, Hyundai सारख्या प्रमुख कार कंपन्यांनी या विभागात त्यांची उत्पादने लाँच केली आहेत.

Kia लवकरच भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक कार Kia EV6 2 जून रोजी लॉन्च करणार आहे. पण याआधी एक नवीन अपडेट समोर आले आहे. Kia EV6 ला NCAP ग्लोबल सेफ्टी रेटिंगमध्ये 5-स्टार क्रॅश रेटिंग मिळाले आहे.

अपघात चाचणी दरम्यान, वाहनाने प्रौढांच्या सुरक्षेमध्ये 90 टक्के आणि मुलांच्या सुरक्षिततेमध्ये 86 टक्के गुण मिळवले आहेत. भारतात या कारचे बुकिंग उद्यापासून सुरू होईल आणि मर्यादित संख्येत उपलब्ध असेल.

Kia ने नुकतीच देशात आपली चौथी कार लॉन्च केली होती, त्यानंतर कंपनी आता या वर्षातील दुसरी मोठी कार लॉन्च करणार आहे. Kia EV6 हे ग्लोबल ई-जीएमपी प्लॅटफॉर्मवर तयार केले आहे.

Kia EV6 जागतिक स्तरावर 58kWh युनिट आणि 77.4kWh युनिट असलेल्या दोन बॅटरी पॅकसह सादर करण्यात आला आहे.

त्याची बेस ट्रिम ही RWD आवृत्ती असेल जी 225bhp आणि 350Nm टॉर्क बनवेल, तर टॉप-एंड ट्रिम ही AWD आवृत्ती असेल जी 345bhp आणि 605Nm टॉर्क बनवेल. ही इलेक्ट्रिक कार पाच रंगांच्या पर्यायांसह सादर केली जाईल.

Kia EV6 मध्ये LED हेडलॅम्प, 19-इंच अलॉय व्हील, LED टेललाइट्स, मागील बंपर आणि शार्क-फिन अँटेना यांसारखी वैशिष्ट्ये मिळण्याची अपेक्षा आहे.

2022 Kia EV6 ला 12.3-इंच स्क्रीन, इलेक्ट्रिक सनरूफ, हवेशीर फ्रंट सीट्स, ड्राइव्ह मोड्स, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, यूव्ही-कट ग्लास आणि ऑटो-होल्ड फंक्शनसह इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक मिळण्याची अपेक्षा आहे.