file photo

Mhlive24 टीम, 24 ऑक्टोबर 2020 :- अनेक वाद प्रतिवादानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये आले . परंतु सध्या ते सोशल मीडियात भलतेच ट्रोल होऊ लागले आहेत.

एकनाथ खडसेंनी दिलेला राजीनामा सर्वत्र व्हायरल होत आहे. हा राजीनामा फेटाळण्याची मागणी केली जाऊ लागली.

त्याला कारण म्हणजे एकनाथ खडसेंनी लिहिलेल्या २ ओळींच्या राजीनाम्यात मराठी शुद्धलेखनाच्या अनेक चुका आढळून आल्या आहेत.

त्यामुळे अनेकांनी खडसेंना ट्रोल केलं आहे. प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी याबाबत सोशल मीडियात आवाज उठवल्यानंतर नेटकऱ्यांनी एकनाथ खडसेंना चांगलेच धारेवर धरलं आहे.

हेरंब कुलकर्णी यांनी या पत्राबाबत काय म्हटलंय? :-

१) प्रती शब्द प्रति हवा

२)वैयक्तीक शब्द वैयक्तिक हवा

३)प्राथमीक शब्द प्राथमिक हवा

४)ऑक्टोबर वर टिंब दिलाय तो नको

५) पत्राच्या वर महसुल शब्द महसूल हवा

६) कृषीमंत्री शब्द कसा लिहावा?

७) विधानसभा हा शब्द जोडून हवा

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology