पूरग्रस्तांसाठी आठ ट्रक धान्य रवाना

MHLive24 टीम, 26 जुलै 2021 :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य बाजारातून कोकणातील दुर्घटनाग्रस्त आणि पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून आठ ट्रक भरून अन्न धान्य पाठवले. या वेळी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सभापती अशोक डक, धान्य मार्केट संचालक नीलेश विरा उपस्थित होते.

राष्ट्रवादीकडून मदत :- नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसने पूरग्रस्त चिपळून, महाड येथील नागरिकांच्या मदतीसाठी मुंबई एपीएमसी धान्य मार्केटमधून आठ ट्रक भरलेल्या 80 हजार किलो अन्नपदार्थ रवाना करण्यात आले.

यासाठी मुंबई एपीएमसी सभापती अशोक डक यांच्या मार्गदर्शनाखाली धान्य मार्केटच्या संचालक नीलेश बिरा, ग्रोमाचे सेक्रेटरी अमृतलाल जैन आणि उप सचिव एन. डी. जाधव यांनी मार्केटमध्ये धान्य, डाळी, रवा, पोहा, साखर आणि चार टन चहा ट्रकमध्ये लोडिंग करून व्यवस्थित करण्यासाठी सहकार्य केले.

Advertisement

पाणीही पाठविणार :- आजपासून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. दर दिवशी येथून पूरग्रस्तांसाठी काही न काही पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती डक यांनी दिली. पूरग्रस्त नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी दहा हजार लिटर्स पाण्याचा एक ट्रक लवकर पाठविण्यात येणार आहे.

रेशनिंग, किटस् आणि इतर काही लागणारे धान्य मार्केट व्यापारी असोसिएशनच्या वतीने पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रोमाचे सचिव भीमजी भानुशाली यांनी सांगितली.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker