Edible Oil Portal: सर्वसामान्यांना खुशखबर ! तेलाच्या किमती होणार कमी; शासनाने उचलले आता ‘हे’ पाऊल

MHLive24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- दीर्घकाळापासून महागाईने त्रस्त असलेल्या लोकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. सर्वसामान्य लोकांना खाद्यतेल स्वस्तात मिळून देण्यासाठी शासनाने साठेबाजीविरोधात कम्बर कसली आहे.(Edible Oil Portal)

या प्रकरणी ग्राहक व्यवहार मंत्रालय एक्शन मध्ये आले आहे. याच अनुशंघाने आता सरकारने Edible Oil पोर्टल तयार केले आहे. हे Edible Oil पोर्टल सोमवारपासून सुरू होणार आहे.

या विशेष पोर्टलवर तेलबियांची किंमत आणि साठ्याची तपशीलवार माहिती उपलब्ध होईल. यासह, साप्ताहिक अपडेट देखील दिली जातील. या पोर्टलवर दर आठवड्याला डेटा प्रसिद्ध केला जाईल. म्हणजेच, आता त्यात त्रुटी येण्याची शक्यता नगण्य असेल.

Advertisement

यासाठी निर्मात्यांना लॉगिनही तयार करावे लागेल. केवळ सरकारचे विभाग त्यावर नजर ठेवतील. सरकारला आशा आहे की यामुळे पारदर्शकता वाढेल आणि तेलाच्या किंमतीही नियंत्रणात राहतील.

सोमवारपासून पोर्टल सुरू होईल

व्यापारी आणि उद्योग याद्वारे त्यांच्या स्टॉकचा खुलासा देऊ शकतात, ज्याचे निरीक्षण राज्य सरकार करेल. सरकार फक्त खाद्यतेल आणि तेल बियाण्यांच्या साठ्यासाठी नवीन पोर्टल सुरू करत आहे. यामुळे साठेबाजीला आळा घालण्यास मदत होईल. यासाठी सरकारने शुक्रवारी मोठी बैठक घेतली होती. यामध्ये पोर्टलबाबत प्रशिक्षण देण्यात आले असून संपूर्ण प्रक्रियेशी संबंधित माहितीही देण्यात आली आहे.

Advertisement

शुक्रवारी असेल प्रशिक्षण

राज्यांचे सहसचिव आणि अन्न सचिव आणि फूड कमिश्नर ही या बैठकीला उपस्थित होते. खाद्यतेल प्रक्रिया संस्थांचे प्रतिनिधीही बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली आणि त्यानंतर हे पोर्टलबाबत एकमत झाले.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker