Save 30 rupees and become a millionaire : अर्थतज्ज्ञ सांगतात दिवसाला 30 रुपये वाचवूनही बनता येत करोडपती, जाणून घ्या संपूर्ण माहिती

MHLive24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- आपण करोडपती व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. पण करोडपती होणं इतकं सोपं आहे का? करोडपती बनण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. पण जर काही इन्व्हेस्टमेंट सिस्टमॅटिकरित्या केल्या, तर ते वाटतं तितकं कठीणही नाही.(Save 30 rupees and become a millionaire)

नोकरी असो किंवा बिझनेस असो प्रत्येकाला पैसा कमवून श्रीमंत होण्याची इच्छा असते. काही लोक अथक प्रयत्नांनी पैसा कमवतातही तर काही लोक गुंतवणुकीतून भरघोस नफा मिळवतात.

आम्ही तुम्हाला गुंतवणुकीचा असाच एक उत्तम पर्याय सांगणार आहोत. ज्यामध्ये कमी गुंतवणुकीवर उत्तम नफा मिळेल. आपण दिवसाला 30 रुपये जमा करुनही करोडपती होऊ शकतो. चला कसे ते जाणून घेऊया…

Advertisement

दिवसाला 30 रुपये वाचवून बना करोडपती 

आर्थिक तज्ञ सांगतात की जर तुम्ही 20 वर्षांचे असताना दिवसाला 30 रुपये गुंतवले तर वयाच्या 60 व्या वर्षी तुम्ही करोडपती होऊ शकता. दररोज 30 रूपये जमा म्हणजे महिन्यात 900 रुपये.

या फंडांसाठी दरमहा म्युच्युअल फंडाच्या एसआयपी (सिस्टीमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) मध्ये गुंतवणूक करावी लागते. आपण हे सोप्या शब्दात सांगायचे तर 40 वर्षांसाठी दरमहा फक्त 900 रुपये गुंतवून तुम्ही करोडपती

Advertisement

होऊ शकता. चला कसे ते जाणून घेऊया

समजा राम (काल्पनिक नाव) 20 वर्षांचा आहे. तो दिवसाला 30 रूपये वाचवतो आणि त्या पैशांची 40 वर्षांसाठी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करतो. म्युच्युअल फंडाची सरासरी एसआयपी 12.5% परतावा मिळवते. अशा पद्धतीने तो 40 वर्षानंतर तो करोडपती होईल.

समजा तुमचे वय 25 आहे तर

Advertisement

वय – 25 वर्ष
मंथली इन्वेस्टमेंट: 5000 रुपये
व्याज दर: 10 टक्के
रिटायरमेंट वय : 60 वर्ष
इन्वेस्टमेंट रकम: 21 लाख रुपये
इंटरेस्ट द्वारे इनकम: 1.70 करोड़ रुपये
एकूण मिळणारी रक्कम : 1.91 करोड़ रुपये

वयाच्या 30 व्या वर्षी हे काम करावे लागेल

जर तुम्ही 30 वर्षांचे आहात आणि तुम्हाला निवृत्तीच्या वयात सुमारे 2 कोटी रुपये पाहिजे असतील तर तुम्हाला दरमहा 8 हजार रुपये गुंतवावे लागतील. तुमच्या गुंतवणूकीवर तुम्हाला केवळ 10 टक्के परतावा मिळाला तरी निवृत्तीपर्यंत तुम्हाला सुमारे 2 कोटी रुपये सहज मिळतील.

Advertisement

म्युच्युअल फंडाची कोणती योजना वेगात पैसे बनवते?

छोट्या किंवा मिडकॅप फंडांच्या योजना जलद पैसे बनवतात. ते 25-30 वर्षांपेक्षा कमी असतात, परंतु जर यात रिस्क जास्त असेल तर त्याचा फायदाही जास्त होतो.

 

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker