खा. संजय राऊत म्हणाले `या` आठवड्यात सुरु होणार धार्मिक स्थळं, जीम

Mhlive24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :  कोरोनाला रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊन केले होते. भारतात मार्च महिन्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. लॉकडाऊनमुळे जनजीवन ठप्प झाले होते. आता यातून सावरण्यासाठी सरकार टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया राबवत आहे.

मात्र, राज्यातील धार्मिक स्थळं मंदिरं आणि जीम अद्याप बंद आहेत. यावर खा. संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. राज्यात धार्मिक स्थळं मंदिरं आणि जीम सुरू करण्याबाबत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी संकेत दिले आहेत.

राज्यातील मंदिरे आणि जीम सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निर्णय होण्याची शक्यता आहे, असंही संजय राऊत यांनी गुरूवारी स्पष्ट केलं आहे. खासदार संजय राऊत यांनी गुरूवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Advertisement

राऊत म्हणाले, राज्यातील धार्मिकस्थळं आणि जीम सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच भाष्य केलं आहे. माझ्या माहितीनुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात धार्मिकस्थळं आणि जीम सुरू करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

याबाबत मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतील. 31 ऑगस्टपर्यंत राज्यातील मंदिरं सुरू न केल्यास एक लाख वारकऱ्यांसोबत पंढरीतील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात प्रवेश करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला दिला आहे.

भाजपच्या आध्यात्मिक समन्वय समितीने मंदिरं सुरू करण्यासाठी राज्यभर घंटानाद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. गणेश विसर्जनानंतर राज्यातील जनजीवन सामान्य होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Advertisement

महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक बळी गेले आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्यापासून मोठ्या संख्येने कोरोनाचे पेशंट सापडत आहेत. कोरोनाची लस कधी येणार याकडे लक्ष लागलं आहे.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24.com वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा mhlive24@gmail.com

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker