दोन कोटींच लाच मागणा-या डीवायएसपींना अटक

MHLive24 टीम, 25 जुलै 2021 :- परभणीतील उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस नाईकाला दोन कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपाखाली मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

25 लाखांची रोख जप्त :- तक्रारदार व्यावसायिकाची एक ध्वनिफीत व्हायरल झाली होती. त्या ध्वनिफितीवरून तक्रारदाराविरोधात कारवाई न करण्यासाठी लाच मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अटकेनंतर एसीबीने अधिका-याच्या दादर येथील फ्लॅटमध्येही शोध मोहिम राबवली. तेथून 25 लाखांची रोख जप्त करण्यात आली आहे.

काय घडले ? :-  एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, परभणीतील सेलू विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल(55) व पोलिस नाईक गणेश चव्हाण(37) अशी अटक आरोपींची ओळख पटली आहे. 3 मेला तक्रारदाराच्या मित्राचा दुर्घटनेत मृत्यू झाला होता.

Advertisement

याप्रकरणी परभणीतील सेलू पोलिस ठाण्यात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात एकाला स्थानिक पोलिसांनी अटकही केली होती. त्या वेळी तक्रारदाराने त्याच्या कर्मचा-याच्या दूरध्वनीवरून मृत मित्राच्या पत्नीला दूरध्वनी केला होता. त्यात काही वादग्रस्त संवाद झाले.

ते संभाषण या कर्मचा-याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाले. त्यानंतर त्याने एका दुस-या कर्मचा-याला पाठवले व त्यानंतर ते संपूर्ण परभणीत वायरल झाले. त्यानंतर पाल याने तक्रारदाराला त्याच्या कार्यालयात बोलावून घेतले. त्या वेळी तुझी वायरल झालेली क्लीप मी ऐकली असून त्यातून बाहेर पडायचे असल्यास मला दोन कोटी रुपये दे, अशी मागणी पाल यांनी केली.

दहा लाख स्वीकारताना अटक :- तडजोडी अंती दीड कोटी रुपये स्वीकारण्यास पाल तयार झाले. त्यानंतरही पाल तक्रारदाराला नियमित दूरध्वनी करून पैशांची मागणी करत होते. ही रक्कम देण्याची इच्छा नसल्यामुळे अखेर तक्रारदाराने याप्रकरणी थेट मुंबई एसीबी व महासंचालक कार्यालयात येऊन याबद्दल तक्रार केली.

Advertisement

या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर मुंबई एसीबीच्या पथकाने सापळा रचून प्रथम पाल यांचा सहकारी पोलिस नाईक चव्हाणला लाचेचा पहिला दहा लाखांचा हफ्ता स्वीकारताना रात्री अटक केली.

त्यानंतर पाल यांनाही शनिवारी पहाटे याप्रकरणी अटक करण्यात आली. या अटकेनंतर पालच्या मुंबईतील दादर येथील निवासस्थानी शोध मोहीम राबवण्यात आली. तेथे 25 लाख रुपयांची रोख रक्कम सापडली आहे.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker