Mhlive24 टीम, 25 ऑक्टोबर 2020 :-  नवरात्राचा शेवटचा दिवस म्हणजे दसरा. ९ दिवस अधिष्ठान केलेल्या देवीने महिषासूर राक्षसाचा या दिवशी वध केला असे म्हटले जाते.

तसेच प्रभू श्रीरामानेही याच दिवशी रावणाचा वध केल्याने या सणाला विजयादशमी असेही म्हटले जाते. आज नऊ दिवसांच्या नवरात्र उत्सवाची सांगता दसरा सणाने होणार आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या या दिवशी अनेक शुभकार्य केली जातात.

नवीन वस्तू, घर, गाडी खरेदीसाठी हा दिवस शुभ मानला जातो. तसंच विजयादशमी निमित्त सोनं खरेदीसाठी लोकं मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. आश्विन शुद्ध दशमी तिथी आणि दुष्ट प्रवृत्तींवर विजय मिळवल्याचा हा दिवस म्हणून ‘विजयादशमी’ या नावाने ओळखला जातो.

या दिवशी रावण दहनासह सरस्वती पूजन, शस्त्र पूजनही केले जाते. जाणून घ्या दसऱ्यासाठी पुजेचा शुभ मुहूर्त विजयादशमीच्या पुजेचा शुभ मुहूर्त दुपारी १ वाजून १२ मिनिटांनी सुरू होत दुपारी ३ वाजून २७ मिनिटांपर्यंत आहे. तुम्हाला पुजेसाठी २ तास १५ मिनिटांची वेळ आहे.

या दिवशी विजय मुहूर्त दुपारी १ वाजून ५७ मिनिटांपासून ते दुपारी २ वाजून ४२ मिनिटांपर्यंत आहे. हा एकूण वेळ ४५ मिनिटांचा आहे.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology