इंटरनेटवर सर्वाना मागे टाकत मोस्ट सर्चेबल ठरतायेत ड्रग केस आणि ‘ह्या’ अभिनेत्री

Mhlive24 टीम, 28 सप्टेंबर 2020 :- अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी राहत्या घरात आत्महत्या केली. त्यानंतर या प्रकरणात अनेक वळणे आली. हा तपास आता NCB ड्रग्ज अँगलने करत आहे. 

रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक याला आणि सॅम्युअल यांना एनसीबीने अटक केल्यानंतर रिया चक्रवर्तीला अटक केली.  रियाने एनसीबीला दिलेल्या 20 पानांच्या कबुली जबाबात गंभीर खुलासे केले आहेत. यामध्ये रियाने अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांची नावं घेतली असल्याची माहिती आहे. 

यानुसार  दीपिका पादुकोण, अभिनेत्री सारा अली खान आणि श्रद्धा कपूरही एनसीबी कार्यालयात पोहचल्या. त्यामुळे २० ते २७ सप्टेंबरदरम्यान गुगल सर्चमध्ये दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुलप्रीत सिंग, ड्रग्स, बॉलिवूड, 

Advertisement

ऑनलाइन चॅट, इंडियन फिल्म ॲक्ट्रेसेस नावाने सर्वाधिक सर्चिंग होत आहे. सध्या गुगलवरील टॉपिक मध्ये समन्स, ऑनलाइन चॅट, इंडियन फिल्म ॲक्ट्रेसेस, बॉलिवूड, लिगल केस, सारा अली खान, बॉलिवूड ड्रग्स केस, ड्रग्स केस इन बॉलिवूड, एसएसआर ड्रग्स केस नावाने सर्चिंग होत आहे. 

कोठून काय सर्च झाले ? :-  मुंबई, पुण्यातून ‘एसएसआर ड्रग्स केस’ नावाने सर्वाधिक सर्च झाले. ‘दीपिका पदुकोण चॅट ड्रग्स’ नावाने सर्वाधिक सर्च दिल्ली, कर्नाटकमधून झाले, तर ‘सारा अली खान ड्रग्स चॅट’ नावाने महाराष्ट्रातून सर्वाधिक सर्च झाले आहे.

मागील सात दिवसांत दीपिका पदुकोण चॅट ड्रग्स, दीपिका पदुकोण चॅट नावाने सर्वाधिक सर्च दिल्लीत झाले. यानंतर हरियाना, महाराष्ट्र, उत्तराखंडचा नंबर लागतो. ‘दीपिका पदुकोण ड्रग्स केस’ नावाने सर्वाधिक सर्च कर्नाटक, दिल्ली, उत्तराखंड, महाराष्ट्र, पंजाब राज्यात झाले आहे.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker