कोरोनाकाळात साैरऊर्जेच्या वापरात दुप्पट वाढ

MHLive24 टीम, 31 जुलै 2021 :- टाळेबंदीच्या काळात पुण्यात सौरऊर्जेच्या वापरात मोठी वाढ झाली आहे. ही वाढ थोडीथोडकी नसून जवळपास दुप्पट आहे. टाळेबंदीच्या काळात दैनंदिन व्यवहार ठप्प झाल्याने अनेक कार्यालये, बाजारपेठा आणि दुकाने बंद होती. त्याचा थेट परिणाम विजेच्या मागणीवर झाल्याचे पुणे महानगरपालिकेच्या पर्यावरण अहवालातून समोर आले आहे.

व्यावसायिक विजेचा वापर निम्म्यानं घटला :- 2018-19 मध्ये व्यावसायिक ऊर्जेचा वापर 1324.53 दशलक्ष युनिट इतका झाला होता; मात्र टाळेबंदीच्या काळात व्यावसायिक ऊर्जेचा वापर2019-20 या वर्षात 743.56 दशलक्ष युनिट इतका झाल्याने या काळात विजेची मागणी तब्बल 50 टक्क्यांपर्यंत खाली आल्याचे स्पष्ट झाले. याच कालावधीत सौरऊर्जेचा वापर दुप्पटीने वाढला आहे.

घरगुतीचा सर्वाधिक वापर :- या अहवालात दिलेल्या माहितीप्रमाणे पुण्यात सर्वाधिक वापर हा घरगुती वापरासाठी होत असून, त्या खालोखाल व्यवसाय, उद्योग, महापालिकेचे प्रकल्प, शेती यासाठी होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Advertisement

घरासाठी किती किलोवॅटचा सोलर प्लांट ? :- घरासाठी किती किलोवॅट साैर प्रकल्प लागेल, हे किती वीज लागते यावर अवलंबून आहे. महिन्याला विजेचे बील एक जार रुपये येत असेल तर एक किलोवाॅटचा प्रकल्प पुरेसा ठरतो. दहा हजार रुपये वीजबील असेल तर त्या घरासाठी 10 किलोवाॅटचा प्रकल्प लागेल.

अनुदान किती ? :- सोलर पॅनल लावण्यासाठी न्यू एन्ड रिन्यूएबल एनर्जी मंत्रालयाकडून 30 टक्क्यांचे अनुदान दिले जाते. घराच्या छतावर सोलर पॅनल्स इन्स्टॉल करण्याचा खर्च साधारण एक लाख रुपये इतका आहे. त्यापैकी 30 हजार रुपये केंद्र सरकारकडून मिळतील.

सोलर पॅनल लावण्यासाठी राज्यांकडूनही अनुदान मिळते. त्याची रक्कम वेगवेगळी असते. सोलर पॅनल्सची कालमर्यादा साधारण 25 वर्षांची असते. दहा तासांच्या सूर्यप्रकाशामुळे 10 युनिट वीज तयार होते. याचा अर्थ दोन किलोवाँटचा सोलर पॅनल लावल्यास महिन्याला 300 युनिट वीज तयार होईल. ही वीज विकता येते.

Advertisement

किती विजेची निर्मिती होते ? :- दहा किलोवाॅट प्रकल्पाच्या माध्यमातून महिन्याला 1200 युनिट वीजनिर्मिती होते. त्यानुसार तुमच्या घरासाठी सोलर प्लांटची निवड करावी.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker