बापरे ! ‘हे’ भारतातील दानशूर श्रीमंत व्यक्ती दररोज करतात 27 कोटी रुपयांचं दान

MHLive24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :- देशात श्रीमंत लोकांची यादी कमी नाही. अनेक श्रीमंत लोक पैसे कमावतात. कैक कोटींमध्ये रोजचा इन्कम या लोकांचा असतो. परंतु यातील काही लोक दान करण्याच्या बाबतीत देखील अग्रेसर असतात. असेच काही भारतीय व्यक्ती आहे कि ज्या दान करण्याचा बाबतीत अग्रेसर आहेत.(Donation by richest people in India)

जाणून घेऊयात सविस्तर… आयटी कंपनी विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी यांनी 2020-21 या आर्थिक वर्षात एकूण 9,713 कोटी रुपये म्हणजेच दररोज 27 कोटी रुपये दान केले आहेत. EdelGive Hurun India Philanthropy List 2021 जाहीर झाली आहे.

प्रेमजी नंतर एचसीएल टेक्नॉलॉजीचे शिव नाडर होते, ज्यांनी धर्मादाय कारणांसाठी 1,263 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी 577 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. यादीत तिसरे स्थानपटकावले आहे.

Advertisement

कुमार मंगलम बिर्ला यांनी 377 कोटी रुपयांसह चौथ्या क्रमांकावर स्थान मिळवले. देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी हे आपत्ती निवारणासाठी 130 कोटी देणगीसह देणगीदारांच्या यादीत आठव्या स्थानावर आहेत.

इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी यांच्या क्रमवारीतही सुधारणा झाली असून, 183 कोटी रुपयांच्या देणगीसह ते यादीत पाचव्या स्थानावर आहेत. हिंदुजा कुटुंबाने 166 कोटी रुपयांच्या देणगीसह यादीत सहावे स्थान पटकावले.

हुरुन इंडिया फिलान्थ्रॉपी लिस्टमध्ये यावर्षी नऊ महिलांचा समावेश करण्यात आला आहे. रोहिणी नीलेकणी परोपकाराच्या रोहिणी नीलेकणी यांनी 69 कोटींची देणगी दिली. USV च्या लीना गांधी तिवारी यांनी 24 कोटी आणि थरमॅक्सच्या अनु आगा यांनी 20 कोटी रुपये दान केले.

Advertisement

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker