तुमची LIC पॉलिसी आहे? मग तुम्हाला माहिती असलीच पाहिजे ‘ही’ अत्यंत उपयोगाची माहिती

MHLive24 टीम, 27 जुलै 2021 :- आता सर्व जग ऑनलाईन झाल आहे. आता एलआयसी पॉलिसीसंबंधित कामेही आता ऑनलाईन करता येतात. एकदा ही सेवा सक्रिय झाल्यानंतर पॉलिसीधारक ई-सेवेची सुविधा सहज मिळवू शकतात. या अंतर्गत एलआयसी पॉलिसीची स्थिती, सर्व तपशील आणि स्टेटमेन्ट सहज मिळू शकते. पूर्वी या सेवा फक्त एलआयसीच्या शाखेतून मिळायच्या पण आता तुम्हाला ती मोबाईलवरही मिळू शकेल.

ऑनलाइनद्वारे अशी घ्या आपल्या एलआयसी पॉलिसीची माहिती :- एलआयसी पॉलिसीची ऑनलाइन माहिती मिळवण्यासाठी सर्वांत आधी एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटवर https://www.licindia.in रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन नि:शुल्क आहे. यासाठी तुमचे नाव, जन्म तारीख, पॉलिसी क्रमांक नोंदवावा लागेल. एकदा तुमचे नाव रजिस्टर झाले की तुम्ही केव्हाही तुमच्या पॉलिसीची अद्ययावत माहिती घेऊ शकता.

अशी घ्या आपल्या एलआयसी पॉलिसीची कॉलवर माहिती :- तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही 022-68276827 या क्रमांकावर फोन करू शकता किंवा 9222492224 या क्रमांकावर LICHELP आणि पॉलिसी नंबर पाठवून माहिती मिळवू शकता. मेसेज पाठवण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाहीत.

Advertisement

एसएमएसद्वारे माहिती मिळवा :- ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केली नाही, त्यांना आपल्या मोबाईल फोनवर एसएमएसद्वारेही माहिती मिळू शकेल. यासाठी पॉलिसीधारकास 56767877 वर संदेश पाठवावा लागेल. तुम्हाला प्रीमियम हप्ता जाणून घ्यायचा असेल तर ASKLIC नंतर पॉलिसी क्रमांक लिहा आणि नंतर प्रीमियम पाठवा आणि ते 56767877 वर पाठवा.

बोनसच्या रकमेबद्दल, ASKLIC नंतर पॉलिसी नंबर, बोनस लिहा आणि ते 56767877 वर पाठवा. पुनरुज्जीवन रक्कम जाणून घेण्यासाठी, ASKLIC नंतर, पॉलिसी क्रमांक पुनरुज्जीवन लिहा आणि ते 56767877 वर पाठवा. तेथून त्वरित एक संदेश येईल ज्यामध्ये संपूर्ण माहिती दिली जाईल.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker