‘ह्या’ मोठ्या बँकेत खाते आहे? रिझर्व्ह बँकेने केलीये मोठी कारवाई

MHLive24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- केवायसी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिर्झव्ह बँक ऑफ इंडियाने अॅक्सिस बँकेला 25 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या दंडाची घोषणा सेंट्रल बँकेकडून 1 सप्टेंबर रोजी करण्यात आली.       ( Action taken by the Reserve Bank )

रिर्झव्ह बँक ऑफ इंडियाने नेमून दिलेल्या केवायसी नियमांचे पालन न केल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला आहे, अशी माहिती आरबीआय (RBI) ने दिली. बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट 1949 च्या सेक्शन 47A (1) (C) आणि सेक्शन 46 (4) (i) या सेक्शन अंतर्गत आरबीआयकडून अॅक्सिस बँकेला दंड ठोठावण्यात आला आहे.

अलीकडच्या काही वर्षांमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक नियम कठोर केल्याने अनेक बँकांना दंड ठोठावल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच RBI ने हिमालच प्रदेशातील भगत शहरी सहकारी बँकेवरही अशाचप्रकारची कारवाई केली होती.

Advertisement

या बँकेने अनुत्पादित मालमत्तेसंबंधीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी RBI ने बँकेला 15 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय, दिल्ली नागरिक बँकेलाही रिझर्व्ह बँकेकडून दणका देण्यात आला आहे. या बँकेला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.

या आधीही दोन बॅंकावर कारवाई :- भारतीय रिझर्व्ह बँकेने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी देशातील चार बड्या सहकारी बँकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये मुंबईतील सारस्वत सहकारी बँक आणि एसव्हीसी सहकारी बँकेचा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेने या दोन्ही बँकांना अनुक्रमे 25 लाख आणि 37.50 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

तर उर्वरित दोन बँकांमध्ये आंध्र प्रदेशातील महेश को-ऑपरेटिव अर्बन बँक आणि अहमदाबादच्या मर्केंटाइल को-ऑपरेटिव बँकेचा समावेश आहे. यापैकी महेश को-ऑपरेटिव अर्बन बँकेला 1 कोटी 12 लाख 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर मर्केंटाइल सहकारी बँकेला 62.50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker