शेतीमधून करा ‘ही’ लागवड; मिळतील पैसेच पैसे

MHLive24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- शेतकऱ्यांनी आता पारंपरिक शेती व्यतिरिक्त आधुनिक शेतीकडे तसेच नवनवीन उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे, शेतामध्ये पहिले फळे,शेती,भाजीपाला धान्य अशा गोष्टीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते.

मात्र शेतकरी अनुदान नवनवीन प्रयोग करत आहेत व वेगवेगळे प्रकारची लागवड करत आहेत आताच काही शेतकरी औषधी पिके घेत आहेत व त्यातून कमाई करत आहे औषधी पिके घेणे करिता बरेच पर्याय देखील उपलब्ध आहेत त्याकरता फार साधनांची देखील आवश्यकता नसते, तसेच शेती करणं जास्त पाण्याची किंवा विशेष मदतीची आवश्यकता नसते अशा पिकांची लागवड करून बाजारात आपण चांगल्या किंमतीला विकू शकतो.

पुणे शहरापासून काही किलोमीटर असलेल्या वडकी- गायकवाडी येथील नितीन व सचिन गायकवाड बंधूंनी पुदिना शेतीत नाव कमावले आहे. दहा वर्षांपासून सातत्य ठेवत आठ ते दहा एकरांत वर्षभर पुदिना पिकवून त्याची विक्री व्यवस्था तयार करण्यात व त्यातून अर्थकारण उंचावण्यात या बंधूंनी यश मिळवले आहे. ते यातून दिवसाला किमान चौदा हजार रुपयांपर्यंत उत्पन्न कमावतात.

Advertisement

पुणे शहरापासून दहा- बारा किलोमीटरवर असलेल्या वडकी ग्रामपंचायत अंतर्गत गायकवाडवाडी उत्कृष्ट शेतीसाठी ओळखली जाते. लोकसंख्या साधारणपणे हजार ते पंधराशेच्या आसपास आहे. पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. तरीही पाण्याच्या नियोजनातून गावात बारामही फळबाग व भाजीपाला पिके डोलू लागली आहेत.

सीताफळ, चिकू, पेरू यांसह पुदीना, मेथी, पालक, चाकवत, कढीपत्ता, गवती चहा अशी विविधता दिसत आहे. गावातील अनेक उमदे तरुण शेती क्षेत्राकडे वळत आहेत ही समाधानाची बाब आहे. कृषी विभाग व ‘आत्मा’ यांच्या माध्यमातून जलसंधारणासह सेंद्रिय शेती, गटाने विक्री करण्याच्या योजना गावात राबविण्यासाठी ते पुढाकार घेत आहेत.

पुदिना लागवडीचे नियोजन :- पुदिना लागवडीसाठी चांगल्या निचऱ्याची जमीन लागते. पुदिन्यास अन्य पिकांच्या तुलनेत जास्तीचे पाणी लागते. लागवड क्षेत्रामध्ये वाफे तयार करून त्यामध्ये पाणी सोडून पुदिना तुकड्यांची लागवड केली जाते. लागवडीनंतर दोन महिन्यांनी पुदिना कापणीस येतो.

Advertisement

वर्षातून तीन वेळा कापणी करता येते. अन्य पिकांच्या तुलनेत पुदिन्यावर कीड, रोगांचे प्रमाण कमी आहे. लागवड केल्यानंतर किमान तीन वर्षे उत्पादन सुरू रहाते. बाजारपेठेत सतत पुदिना विक्री करायची असल्याने टप्प्याटप्प्याने लागवडीचे नियोजन येथील शेतकरी करतात.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker