धोनीने दिले टीकाकारांना सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाला यासाठी टॉप ऑर्डरमध्ये बॅटिंग करत नाही.

Mhlive24 टीम, 28 सप्टेंबर 2020 :-  पहिल्या सामन्यात महेंद्रसिंग धोनी 7 व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता, त्यावेळी तोपर्यंत चेन्नईने सामना जिंकला होता, त्याचप्रमाणे धोनीने आयपीएलच्या 13 व्या सत्रातील दुसर्‍या सामन्यात 200 पेक्षा जास्त धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतानादेखील सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. त्यानंतर सामना गमावल्यामुळे धोनीवर सर्व स्तरातून टीका झाली होती.

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या २१६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ अखेरच्या षटकापर्यंत २०० धावाच करू शकला. चेन्नईचा संघ तो सामना सोळा धावांनी हरला धोनीने अखेरच्या षटकामध्ये तीन षटकार ठोकले मात्र त्याचा संघाला फायदा झाला नाही.

धोनी टॉप ऑर्डर मध्ये फलंदाजी का करत नाही यावर बोलताना महेंद्रसिंग धोनीने त्याच्या टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे. दिल्ली विरुद्ध तिसर्‍या सामन्यापूर्वी धोनीने हा खुलासा केला होता.

Advertisement

फलंदाजी क्रमवारीत वरती न येण्याचे कारण देताना धोनी म्हणाला की जेथे माझ्या फलंदाजीची माझ्या संघाला गरज आहे तिथेच मी फलंदाजी करेन. परिस्थितीनुसार संघासाठी जे आवश्यक आहे त्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे असे धोनी म्हणाला.

त्याआधी धोनी असेही म्हणाले होते की आम्हाला १४ सामने खेळायचे आहेत पण मला हेदेखील माहित आहे की आपण सारे सामने जिंकू शकत नाही. त्यामुळे जय-पराजय याने जास्त फरक पडत नाही.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker