Mhlive24 टीम, 21 ऑक्टोबर 2020 :-किंग खान शाहरुख आणि काजोल यांच्या अभिनयाने नटलेल्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या सिनेमाची जादू 2५ वर्षा नंतरही कमी झालेली नाही. राज आणि सिमरन अर्थात किंग खान शाहरुख आणि काजोल यांच्या रोमँटिक जोडीने २५ वर्षापूर्वी निर्माण केलीली जादू आजही चित्रपट रसिकांच्या मनावर गारुड घालतेय.

हा सिनेमा इतका हिट झाला की, मराठा मंदिर थिएटरमध्ये दिलवाले दुल्हनिया मुक्काम ठोकून आहे… आणि त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. पहिल्या शो पासून हाउसफुल गर्दी खेचणाऱ्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या सिनेमाला पाहण्यासाठी कॉलेजला जाणाऱ्या मुलांपासून ते थेट आजी-आजोबांपर्यंत प्रत्येक प्रकारचा प्रेक्षक अजूनही मराठा मंदिर मध्ये आवर्जून उपस्थिती लावतो. हा सिनेमा चार कोटींमध्ये बनवला गेला.

पण, १९९५ मध्ये या ब्लॉकब्लस्टर सिनेमाने भारतात ८९ कोटी तर परदेशात १३.५० कोटींचा व्यवसाय केला. म्हणजे १९९५ साली या सिनेमाचा एकूण व्यवसाय १०२.५० कोटींचा होता! आजचा महागाईचा दर गृहित धरला तर या काळात डीडीएलजेचा भारतातील व्यवसाय ४५५ कोटी आणि परदेशातील व्यवसाय ६९ कोटींचा म्हणजे जगभरातील एकूण व्यवसाय ५२४ कोटी असा दमदार आणि अतुलनीय झाला असता! याबद्दल बोलताना शाहरूख खान म्हणाला की, मी डीडीएलजेच्या आधी डर, बाजीगर, अंजाम या सिनेमात मी नकारात्मक भूमिका केल्या होत्या.

शिवाय, मला वाटायचे मी रोमँटिक प्रकारच्या भूमिका करण्यासाठी योग्य नाही. त्यामुळे आदि आणि यशजींनी ही भूमिका करण्याची संधी दिली तेव्हा मला फारच छान वाटले होते पण हे मी कसे करू शकेन, याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती. मी हे नीट करू शकेन का, हे ही मला माहीत नव्हते. “खरंतर मला नेहमीच वाटते की आदिचे माझ्यावर प्रेम असल्याने त्याने मला या सिनेमात घेतले. मला ही व्यक्तिरेखा फारच छान आणि गोड वाटली. यातला सगळा बाकी भाग माझा मीच आणला. ही एक अशी भूमिका होती जी करताना मला लक्षात आले की स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा काही भाग वापरून हे मी करू शकतो.

त्यामुळे त्यातल्या काही गमतीजमती, सवयी, वागण्याची पद्धत खऱ्याखुऱ्या माझ्यासारख्याच आहेत. विशेषत: हलकेफुलके विनोद करत बोलण्याचा भाग.” चाहते एसआरकेला प्रेमाने किंग खान म्हणतात. एसआरके पुढे म्हणाला, “मी हे मान्य करायला हवं की असे छान छान रोमँटिक सिनेमे फारसे न आवडणाऱ्या मला काजोल आणि माझ्यातल्या काही दृश्यांनी बदलून टाकले, मला ते छान वाटू लागले. अगदी खरं सांगतो.” तो पुढे म्हणाला, “डीडीएलजेची गाणी लागली की मी रेडिओचं चॅनल बदलत नाही.

मला त्यांचा कधीच कंटाळा येत नाही. माझा सगळा मार्ग ज्या अविस्मरणीय पद्धतीने बदलला गेला त्या सिनेमाच्या आठवणी त्या निमित्ताने पुन्हा जागृत होतात.”

कुणी दिलं होतं हे टायटल? : – ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ सिनेमाचं टायटल अनुपम खेर यांच्या पत्नी किरण खेर यांनी सुचवलेलं होतं. करण जोहर आणि आदित्य चोप्रा यांच्या डोक्यात अशाप्रकारच्या टायटलचा अजिबात विचार नव्हता. किरणने शशी कपूरच्या ‘ले जाएंगे ले जाएंगे’ गाण्यातून हे टायटल काढलं होतं.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology