पुण्याच्या डीसीपी मॅडमला बिर्याणीची आवड भारी, पैसे द्यायची मात्र नाही तयारी!

MHLive24 टीम, 30 जुलै 2021 :- पुण्यातील झोन एकच्या डीसीपी मॅडमला एसपी हॉटेलची बिर्याणी हवी आहे, ती ही मोफत! याबाबत त्यांनी पोलिस कर्मचा-याशी केलेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप भलती व्हायरल झाली आहे. पोलिस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांची ही क्लिप असल्याचं बोललं जात आहे.

थेट पोलिस महासंचालकांना पत्र :- पुण्यातील नागरिकांनी अनेक कर्तव्यदक्ष अधिकारी पाहिले आहेत. सोबतच अनेक लाचखोर आणि कामचुकार अधिकारीही त्यांच्या वाट्याला आले आहेत. अशाच एका महिला पोलिस अधिकाऱ्याचं फोनवरील संभाषण चांगलंच व्हायरल होत आहे. डीसीपी मॅडमच्या या कारभाराला वैतागलेल्या कर्मचाऱ्यांनी थेट पोलिस महासंचालकांनाच पत्र लिहिलं आहे.

डीसीपी मॅडमची फर्माईश :- जवळपास 5 मिनिटांची ही ऑडिओ क्लिप आहे. त्यात डीसीपी मॅडम मटण बिर्याणी, प्रॉन्स आणि अजून एका नॉन व्हेज भाजीची ऑर्डर द्यायला आपल्या कर्मचाऱ्याला सांगत आहेत. त्यांना हे सगळं एका चांगल्या हॉटेलमधून हवं आहे. हे पदार्थ जास्त तेलकट, तिखटही नको आहेत.

Advertisement

त्याचबरोबर त्याची चव चांगली असावी असाही त्यांचा हट्ट आहे. या डीसीपी मॅडम फक्त ऑर्डर देऊन थांबल्या नाहीत. तर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी आपल्या हद्दीतील हॉटेलमध्ये पैसे का द्यायचे? असा सवाल केला.

तो कर्मचारी मात्र यापूर्वी आपण नेहमी पैसे देऊनच खाद्यपदार्थ आणल्याचं सांगतो आहे; परंतु मॅडम वारंवार त्या कर्मचाऱ्याला हद्दीतील खाद्यपदार्थ फुकट आणण्यासाठी बजावत असल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे. पोलिस निरीक्षकाला सांगा, ते मॅनेज करतील, असंही त्या म्हणतात.

पैसे मागितल्यास हाॅटेल चालकाची तक्रार करण्याचा दम :- समाजकल्याण आयुक्त पदावर असलेल्या मॅडमच्या पतीला मटण बिर्याणी आवडते, तर त्यांना चिकन बिर्याणी. फोनवर ऑर्डर देताना त्या हॉटेल चालकाने पैसे मागितल्यास हद्दीतील पोलिस निरीक्षकाकडे तक्रार करा, असंही त्या आपल्या कर्मचाऱ्याला सांगायला विसरत नाहीत.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker