Cryptocurrency News : क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये सध्या भरपूर चर्चा सुरू आहे. अनेकांनी झटपट श्रीमंत होण्यासाठी क्रिप्टोकरन्सीचा मार्ग निवडला आहे.

अशात अचानक जगभरात उद्भवलेल्या रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध परिस्थितीमुळे अनेक क्रिप्टोकरन्सीचे दर खालीवर झाले होते. दरम्यान काही क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकदारांना भरपूर लाभ देत आहेत.

अशातच क्रिप्टो संबंधीत एक महत्वाची बातमी येत आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी वाईट बातमी आहे. GST परिषद कॅसिनो, बेटिंग आणि लॉटरीच्या धर्तीवर क्रिप्टोकरन्सीवर 28 टक्के कर लावण्याचा विचार करत आहे.

अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये हा दावा करण्यात आला आहे. अहवालात असे म्हटले आहे की जर हा प्रस्ताव जीएसटी कौन्सिलच्या पुढील बैठकीत घेण्यात आला

तर क्रिप्टो मायनिंग तसेच त्यांच्या विक्री आणि खरेदीवर 28 टक्के जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) लावला जाऊ शकतो. जीएसटी कौन्सिलच्या पुढील बैठकीची तारीख अद्याप ठरलेली नाही. वित्त मंत्रालयाने आधीच क्रिप्टो मालमत्ता आणि NFTs च्या हस्तांतरणातून झालेल्या नफ्यावर 30% कर लावला आहे.

जेव्हा बिटकॉइन $30000 च्या खाली पोहोचले, तेव्हा:- जगातील सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी, बिटकॉइनमध्ये मंगळवारी मोठी घसरण झाली. मंगळवारी, बिटकॉइनची किंमत $30000 च्या खाली $29731  वर घसरली.
मात्र, नंतर बिटकॉइनच्या किमतीत काही प्रमाणात सुधारणा झाली. जुलै 2021 पासून बिटकॉइनची ही नीचांकी पातळी आहे. गेल्या एका आठवड्यात बिटकॉइनच्या किमतीत सुमारे 12 टक्क्यांनी घसरण झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बिटकॉइनची किंमत सुमारे $69,000 वर पोहोचली होती.
एका महिन्यात क्रिप्टो मालमत्तेचे बाजार मूल्य सुमारे $ 800 अब्जांनी घटले आहे
गेल्या एका महिन्यात क्रिप्टो मालमत्तेचे बाजार मूल्य सुमारे $ 800 अब्जने घटले आहे. मंगळवारी, क्रिप्टो मालमत्तेचे बाजार मूल्य $ 1.4 ट्रिलियन पर्यंत घसरले. क्रिप्टो मार्केटमध्ये बिटकॉइनचा वाटा सुमारे 40 टक्के आहे.
मंगळवारी बिटकॉइनच्या किमती 10 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्या. तथापि, नंतर ते $30,000 वर $31,450 वर बंद झाले. फक्त 6 दिवसांपूर्वी, बिटकॉइनची किंमत $ 40,000 च्या पातळीवर होती.