क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आता बिझनेस मध्ये; ‘ह्या’ कंपनीद्वारे करणार बिझनेस

MHLive24 टीम, 31 जुलै 2021 :-  मास्टरब्लास्टर महान फलंदाज सचिन तेंडुलकर सध्या काय करतो, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडत असेल. सचिनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो आता बिझनेसमन बनला आहे. क्रिकेटचा देव म्हणून बिरुद मिरवणाऱ्या सचिन तेंडुलकरने डिजिटल मनोरंजन आणि तंत्रज्ञान कंपनी जेटसिंथेसिसमध्ये सुमारे 15 कोटी रुपये (20 लाख डॉलर) गुंतवले आहेत.

गुंतवणुकीमुळे कंपनीचे तेंडुलकरसोबतचे संबंध अधिक दृढ झालेत. या कंपनीच्या भागधारकांमध्ये अदर पूनावाला आणि क्रिस गोपालकृष्णन यांचाही समावेश आहे. जेटसिंथेसिस ही पुणेस्थित कंपनी आहे आणि भारताव्यतिरिक्त जपान, ब्रिटेन, यूरोपीय संघ, अमेरिका येथे त्याची कार्यालये आहेत.

डिजिटल एन्टरटेनमेंट अँड टेक्नोलॉजी कंपनी जेटसिंथेसिस ने गुरुवारी सचिनच्या बिझनेस डीलबद्दल माहिती दिली. भारताचा माजी महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरने आपल्या कंपनीत 20 लाख डॉलरची (जवळपास 14.8 करोड़ रुपये) गुंतवणूक केल्याचे कंपनीने सांगितले. जेटसिंथेसिस ही पुण्यातील कंपनी असून भारतासह जपान, ब्रिटेन, यूरोपीय संघ आणि अमेरिकेतही या कंपनीचे कार्यालय आहेत.

Advertisement

या दोघांचा क्रिकेट खेळासाठी संयुक्त उपक्रम :- या दोघांचा आधीपासून डिजिटल क्रिकेट डेस्टिनेशन 100 एमबी आणि सचिन सागा क्रिकेट चॅम्पियन्स आणि सागा व्हीआर या इमर्सिव क्रिकेट खेळासाठी संयुक्त उपक्रम आहे.

सचिनचे कंपनीशी असलेले नाते 5 वर्षे जुने :- तेंडुलकर म्हणाले, जेटसिंथेसिसशी माझा संबंध जवळजवळ पाच वर्षांचा आहे. आम्ही सचिन सागा क्रिकेट चॅम्पियन्सच्या माध्यमातून आमचा प्रवास सुरू केला आणि एका अनोख्या व्हर्च्युअल रिअॅलिटी क्रिकेट अनुभवासह ते बळकट केले. आता त्याच्या श्रेणीतील हा सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे आणि 2 कोटींहून अधिक वेळा डाऊनलोड केला गेलाय.

जेटसिंथेसिसचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजन नवानी यांच्या म्हणण्यानुसार, सचिन सागा क्रिकेट चॅम्पियन्सचा दैनिक वापर दर 12 महिन्यांत दुप्पट झाला आहे. सध्या त्याचे 20 लाख फॉलोअर्स आहेत. आयपीएल आणि वर्ल्ड कपमुळे आगामी काळात 100 एमबीची वाढ होण्याचीही शक्यता आहे.

Advertisement

कंपनी व्यवसाय :- सचिन सागा क्रिकेट चॅम्पियन्ससारख्या गेम लाँच करण्याबरोबरच जेटसिंथेसिसने गेल्या वर्षी गेमिंग स्टुडिओ नॉटिलस मोबाईल विकत घेतला. गेमिंग स्टुडिओ हा ऑनलाईन क्रिकेट गेम रिअल क्रिकेटचा निर्माता आहे. रिअल क्रिकेटमध्ये 120 मिलियन अधिक डाउनलोड आणि 1.2 कोटी मासिक सक्रिय वापरकर्ते आहेत. खेळांबरोबरच जेटसिंथेसिसने ई-स्पोर्ट्स कंपनी नोडविन गेमिंगची सह-स्थापना देखील केली.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker