अबब ! एकूण संपत्तीपैकी अर्ध्याहून अधिक संपत्ती देशातील १० टक्के श्रीमंतांकडेच आहे;आकडेवारी पाहून चक्रावतील डोळे

MHLive24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :-  आर्थिक सुबत्ता असावी, भरपूर पैसा असावा, श्रीमंत व्हावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. यासाठी सर्वजण आयुष्यभर भरपूर मेहनतदेखील करतात. मात्र फक्त परिश्रम करून किंवा चांगला पगार असलेली नोकरी मिळवून आर्थिक स्थैर्य येणार नाही. त्यासाठी अर्थसाक्षरता महत्त्वाची ठरते. परंतु सध्या देशातील विचार केला तर परिस्थिती खूप विचित्रच दिसते. (Country’s wealth belongs to the richest)

भारत देशात जितकी संपत्ती आहे त्यातील अर्ध्याहून अधिक संपत्ती देशातील १० टक्के श्रीमंतांकडेच एकवटलेली आहे. संपत्तीचा केवळ १० टक्के हिस्सा देशातील ५० टक्के जनतेकडे आहे. सरकारकडून सादर करण्यात आलेल्या एका अहवालानुसार सदर माहिती समोर आली आहे.

ऑल इंडिया डेट अँड इन्व्हेस्टमेंट सर्व्हे २०१९ च्या माहितीनुसार देशातील १० टक्के श्रीमंत वर्गाकडेच शहरी भागातील ५५.७ टक्के संपत्ती आहे. तर ग्रामीण भागात ५०.८ टक्के इतकी संपत्ती श्रीमंतांच्या मालकीची आहे. केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या या सर्व्हेत संपत्तीचं विवरण हे त्यांच्या वित्तीय आधारावर करण्यात आलं आहे.

Advertisement

यातूनच कोणत्या कुटुंबाकडे किती संपत्ती आहे याची गणना करण्यात आली आहे. यात स्थावर मालमत्तेचाही समावेश आहे. इमारती, प्राणी आणि वाहनं यांचाही यात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय कंपन्यांमधले शेअर्स, बँक-पोस्टातील गुंतवणूक इत्यादींचाही समावेश करण्यात आला आहे.

जानेवारी ते डिसेंबर २०१९ या काळात करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांकडे २७४ लाख कोटींची संपत्ती असल्याची माहिती समोर आली. यात जवळपास १४० लाख कोटींची संपत्ती केवळ १० टक्के श्रीमंतांच्या मालकीची असल्याचं दिसून आलं आहे.

ग्रामीण भागातील ५० टक्के गरीबांकडे एकूण संपत्तीपैकी केवळ १० टक्के हिस्सा असल्याचं निष्पन्न झालं आहे. तर शहरी भागात ५० टक्के जनतेकडे एकूण संपत्तीपैकी केवळ ६.२ टक्के हिस्सा आहे. पंजाबमध्ये तर १० टक्के श्रीमंत वर्गाकडे राज्यातील ६५ टक्क्यांहून अधिक संपत्ती आहे. तर ५० टक्के जनतेचा एकूण संपत्तीतील वाटा केवळ ५ टक्के इतका आहे.

Advertisement

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker