Mhlive24.com
Maharashtra Live News Updates in Marathi

महाराष्ट्रातला भ्रष्टाचार मन विषण्ण करणारा !

Mhlive24 टीम, 13 डिसेंबर 2020 :कोरोना काळात महाराष्ट्रात झालेला भ्रष्टाचार मन विषण्ण करणारा आहे, असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

Advertisement
करोनाची लाट थोपवण्यात आपण यशस्वी झालो असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणत आहेत मात्र सर्वाधिक करोना मृत्यूंची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. तसंच अजूनही करोनाचे रुग्ण वाढत आहेत तरीही सरकार का पाठ का थोपटून घेत आहे ते समजत नाही असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाला जी अंतरिम स्थगिती मिळाली ती या सरकारच्या अयोग्य भूमिकेमुळेच असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
अधिवेशनही अवघ्या सात तासांचं घेतलं जातं आहे. त्याला काहीही अर्थ नाही आम्ही जनतेचे प्रश्न कसे काय मांडायचे? असंही देवेंद्र फडणवीस यांनी विचारलं आहे. तसंच या सरकारने वाढीव वीज बिलांबाबत घूमजाव केलं.
कोल्हापुरात पुरात वाहून गेलेल्या एका घरालाही अडीच हजारांचं बिल पाठवण्यात आलं आहे त्यावरुनच सगळ्या गोष्टी लक्षात येत आहेत. वाढीव वीज बिलांबाबत आणि सरकारच्या या धोरणाबाबत आम्ही त्यांना जाब विचारणार आहोत असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement
li