बिग ब्रेकिंग : IPL 2021 मध्ये पुन्हा झाला कोरोनाचा शिरकाव ! हा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह …

MHLive24 टीम, 22 सप्टेंबर 2021 :-  आयपीएलमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यामुळे बीसीसीआय आणि आयपीएल मॅनेजमेंटच्या चिंता वाढल्या आहेत. सनराइजर्स हैदराबादचा खेळाडू कोरोना पॉजिटीव्ह आला आहे. (Corona’s re-entry in IPL 2021) त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेले 6 खेळाडू आयसोलेशनमध्ये आहेत.

महत्वाचे म्हणजे आज सायंकाळी दिल्ली आणि हैदराबादमध्ये मॅच खेळविली जाणार आहे. त्या आधीच नटराजन पॉझिटिव्ह आढळल्याने तरीही सामना खेळविला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आता संघातील अन्य खेळाडूंचीही आरटीपीसीआर टेस्ट केली जाणार आहे.

सनरायझर्स हैदराबादचा आज संध्याकाळी दिल्ली कॅपिटल्सशी सामना होणार आहे. मात्र, आजच्या सामन्यावर याचा कोणताही परिणाम होणार नाही. सामना खेळला जाणार आहे.

Advertisement

सनरायझर्स हैदराबादचा गोलंदाज टी. नटराजन कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. आरटी-पीसीआर चाचणीमध्ये हा निकाल आला आहे जो सामना सुरू होण्यापूर्वी केला जातो. यानंतर त्याच्या संपर्कात आलेले खेळाडू आणि कर्मचारी यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

आयपीएल स्पर्धेला यापूर्वी देखील कोरनाचा फटका बसला होता. आयपीएलच्या बायो-बबलमध्ये करोनाचा शिरकाव झाल्यानं यापूर्वी 29 मॅचनंतर भारतामध्ये सुरू असलेली आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली होती.

त्यानंतर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील मँचेस्टर टेस्ट देखील टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्रींसह सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाल्यानं रद्द करण्यात आली.

Advertisement

आयपीएल स्पर्धेचा दुसरा टप्पा रविवारी सुरु झाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील 3 मॅच झाल्यानंतर लगेच आयपीएलच्या बायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचं उघड झालं आहे.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker