file photo

Mhlive24 टीम, 24 ऑक्टोबर 2020 :- भारतात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अनेक बळी या आजाराने घेतले असून आर्थिक घडी विस्कटून लावली आहे. आज अनेक देश यावर लस शोधण्यासाठी कार्य करत आहेत.

परंतु लस येईपर्यंत प्रशासनाने घालून दिलेले सुरक्षेचे नियम जर आपण पाळले तर आपली कोरोनापासून सुरक्षा होऊ शकते. अद्याप रशियाने आपली लस लॉन्च केली आहे. तर भारतात तीन लशींचे उत्पादन प्रगतीपथावर आहे.

यात ‘सीरम इन्स्टिटयूट’, ‘झाइडसकॅडिला’ आणि ‘भारतबायोटेक’ या तीन कंपन्यांकडून कोरोनाची लस तयार करण्याचे काम सुरू आहे. यातील ‘सीरम इन्स्टिटयूट’ची लस लवकरच येऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोना लस उपलब्ध होईल, असा विश्वास केंद्र सरकारने व्यक्त केला आहे आणि त्यादृष्टिने आता प्रत्येकापर्यंत ही लस पोहोचवण्यासाठी मोदी सरकारने योजनाही तयार केली आहे. मोदी सरकारने कोव्हिड 19 लशीकरण कार्यक्रम तयार केला आहे.

याअंतर्गत केंद्र सरकारचं लशीचे डोस खरेदी करेल आणि राज्यांना त्याचं वाटप करेल. कुणाला मोफत लस दिली जाणार यासाठी केंद्राने प्राधान्यक्रम निश्चित केला आहे. 30 कोटी लोकांचे चार गट तयार करण्यात आले आहेत. असं सूत्रांनी सांगितल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे.

लस देणाऱ्यांसाठी ऑनलाइन प्रशिक्षण मॉड्युल विकसित करण्यात येत आहे. लशीकरणासाठी असलेलं डिजीटल नेटवर्क अधिक मजबूत केलं जातं आहे. सध्या ज्या Universal Immunisation Programme (UIP) अंतर्गत लशीकरण केलं जातं, त्याच माध्यमाचा वापर केला जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात कुणाला लस ? :- डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी, नर्सेस आणि आशा वर्कर्स अशा एक कोटी लोकांना ही लस दिली जाणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात कुणाला लस ? :- दुसऱ्या टप्प्यात महापालिका कर्मचारी, पोलीस अशा 2 कोटी फ्रंटलाइन वर्कर्सना लस दिली जाईल.

तिसऱ्या टप्प्यात कुणाला लस ? :- त्यानंतर 50 वयापेक्षा जास्त वय असलेल्या सुमारे 26 कोटी सर्वसामान्य नागरिकांना लस दिली जाईल.

चौथ्या टप्प्यात कुणाला लस ? :- एक कोटी लोक असे असतील ज्यांचं वय 50 पेक्षा कमी आहे, मात्र त्यांना इतर गंभीर आजार आहेत आणि देखभालीची गरज आहे.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology