मुंबईतील डाॅक्टर महिलेला 14 महिन्यांत तीनदा कोरोना

MHLive24 टीम, 29 जुलै 2021 :- मुंबईतील एका महिला डॉक्टरला गेल्या 14 महिन्यांत तीनदा कोरोना झाला. विशेष म्हणजे लस घेतल्यानंतर दोन वेळा कोरोनाची लागण झाली आहे. डॉ. सृष्टी हलारी असं महिला डॉक्टरचं नाव आहे.

कधी झाली लागण ? :- डॉ. सृष्टी हलारी यांना 17 जून 2020 रोजी पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली. त्यानंतर पुन्हा 29 मे 2021 रोजी झाली आणि त्यानंतर आता 11 जुलै 2021 रोजी कोरोनानं गाठलं. विशेष म्हणजे डॉ. सृष्टींनी मे महिन्याच्या आधीच कोरोनाचे दोन डोस घेतलेले आहेत.

तीन वेळा कोरोना लागण, कारण काय ? :- डॉ. सृष्टी हलारीची ही कोरोना केस देशातली पहिली घटना आहे. त्यामुळेच जीनोम सिक्वन्सिंगसाठी त्यांचं सँपल घेतलं गेलं. डॉ. सृष्टी मुलूंडला राहतात. तीन वेळा त्यांना कोरोनाची लागण झालीच कशी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. डॉक्टर त्याची विविध उत्तरं देतात. त्यात कोरोनाचे नवे व्हेरिएंट तसच इम्युनिटी लेवल किंवा कोरोनाची तपासणी अहवालात काही तरी गडबड झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Advertisement

डॉ. हलारी यांचे दोन सँपल घेतले गेलेत. एक मुंबई महापालिकेने आणि दुसरा खासगी संस्थेने लसीकरणानंतरही कोरोनाची लागण कशी काय झाली याचा तपास केला जात आहे. हे दोन्ही अहवाल अद्याप यायचे आहेत.

डॉ. सृष्टी हलारीचं म्हणणं काय ? :- डॉ. सृष्टी म्हणाल्या, की,त्यांना पहिल्यांदा कोरोना झाला, त्या वेळी त्या कोरोना वॉर्डात काम करायच्या. त्यातूनच त्यांना कोरोनाची लागण झाली असावी. त्यांच्या कुटुंबीयांची चाचणी केली; पण ते सर्व निगेटीव्ह आले. फक्त सृष्टी कोरोनाग्रस्त झाल्या.

कुठलीही लक्षणं नव्हती. दुसऱ्यांदा त्यांना कोरोना झाला, त्या वेळी मात्र काही हलकी लक्षणं होती. चाचणी केल्यानंतर कोरोना डिटेक्ट झाला. डोस घेतल्यानंतरही कोरोना झाल्यानं आश्चर्य वाटलं. उपाय केले.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker