मुंबईत कोरोना संसर्ग आटोक्यात

MHLive24 टीम, 26 जुलै 2021 :-  मुंबईत कोरोना संसर्ग वेगाने नियंत्रणात येत असल्याचे दिसते. झोपडपट्टी परिसरात असणारे 3 कंटेन्मेंट झोन हे एस, आर दक्षिण आणि एम पूर्व विभागात आहेत. आतापर्यंत 2,791 कंटेन्मेंट झोन हटवण्यात आले आहेत.

कंटेन्मेंटच्या संख्येतदेखील घट :- शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आली आहे. त्यामुळे कंटेन्मेंटच्या संख्येतदेखील घट झाली आहे. झोपडपट्टी आणि चाळींच्या परिसरात केवळ तीन तर इमारती परिसरात 62 ‘कंटेन्मेंट झोन’ आहेत. शनिवारी 424 नवे कोरोना बाधित रुग्ण तर नऊ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

सर्वाधिक ‘कंटेन्मेंट झोन’ पश्चिम विभागात :- इमारत परिसरात 62 ‘कंटेन्मेंट झोन’ असून सर्वाधिक ‘कंटेन्मेंट झोन’ हे के पश्चिम विभागात 15 त्या खालोखाल एस 10, एम पूर्व 8, जी उत्तर 7, डी 5, एम पश्चिम 4 तर पी उत्तर, एन, जी दक्षिण, एफ दक्षिण, ई विभागात प्रत्येकी दोन ‘कंटेन्मेंट झोन’ आहेत. 66,080 कंटेंटमेंट झोन शिथिल झाले आहेत.

Advertisement

झोपडपट्टी परिसरात इमारतींच्या तुलनेत जरी कमी ‘कंटेन्मेंट झोन’ असले तरी त्यातील लोकांची संख्या ही इमातींमधील लोकांपेक्षा अधिक आहे. झोपडपट्टी परिसरातील 3 ‘कंटेन्मेंट झोन’मध्ये 5 हजार घर तर 25 हजार लोकांचा समावेश आहे. सोसायट्यांमधील 62 ‘कंटेन्मेंट झोन’मध्ये 4 हजार घर आणि 16 हजार लोकांचा समावेश आहे.

1,810 मजले सील :- सील केलेल्या मजल्यांची संख्या मात्र मोठी असून 1,810 मजले सील करण्यात आले आहेत. आर एस विभागात सर्वाधिक 205 मजले सील झाले आहेत. सील करण्यात आलेल्या मजल्यांवर 73 घर असून त्यात 2 लाख 77 हजार लोकं वास्तव्यास आहेत.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker