हात पकडून प्रेमाची कबुली हा लैंगिक अत्याचार नव्हे!

MHLive24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- अल्पवयीन मुलीचा हात पकडून प्रेमाची कबुली देणे लैंगिक अत्याचार मानले जाऊ शकत नाही, असा महत्वपूर्ण निकाल पोक्सो न्यायालयाने दिला. एका २८ वर्षीय व्यक्तीने २०१७ मध्ये एका १७ वर्षीय मुलीचा हात पकडून तिला प्रपोज केले होते. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली होती.

लैंगिक अत्याचाराचा हेतू नाही :- न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटले, की असा कोणताही पुरावा नाही, ज्यामुळे सिद्ध होईल की आरोपीचा हेतू लैंगिक अत्याचार करण्याचा होता. निर्णय देताना न्यायालयाने म्हटले, की असे कोणतेही पुरावे नाहीत, ज्यातून सिद्ध होईल की आरोपी वारंवार पीडितेचा पाठलाग करत होता. त्याने तिला एखाद्या निर्जन ठिकाणी अडवले किंवा अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करण्यासाठी बळाचा वापर केला, असे घडले नाही.

आरोपीची सुटका :- न्यायमूर्तींनी निर्णय देताना म्हटले आहे, की आरोपीने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला, याबाबत फिर्यादी पक्ष कोणतेही पुरावे सादर करू शकलेला नाही. त्यामुळे शंकेचा फायदा देत आरोपीची सुटका करण्यात येत आहे.

Advertisement

हात पकडला, म्हणून शिक्षा देण्यास नकार :- दरम्यान, न्यायालयात आतापर्यंत अनेक प्रकरणे आली, ज्यात आरोपीने मुलीचा हात पकडला आहे; पण न्यायालयाने गुन्हा मानण्यास नकार दिला आहे. याआधी मुंबई उच्च न्यायालयाने पाच वर्षाच्या मुलीसोबत कथित छेडछाड केल्याप्रकरणी पन्नास वर्षीय व्यक्तीला दिलेली शिक्षा बदलली होती.

न्यायालयाने म्हटले होते, की पँट काढून एखाद्या अल्पवयीन मुलाचा हात पकडणे लैंगिक अत्याचाराच्या व्याख्येत मोडत नाही. प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्सुअल ऑफेंसेस ऍक्टला ‘पोक्सो’ म्हटले जाते. याअंतर्गत १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसोबत होणाऱ्या लैंगिक अत्याचाराप्रकरणी गुन्ह्यांबाबत सुनावणी केली जाते.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker