कोरोना उपचाराच्या खर्चाची काळजी सतावतेय? ‘ह्या’ बँकेची कोरोना रक्षक पॉलिसी आहे बेस्ट

MHLive24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाव्हायरसचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. तसेच कोरोनावरील उपचार सगळ्यांनाच परवडणारा नाही. राज्य सरकारने काही औधषांच्या किमती कमी केल्या आहेत. मात्र, हॉस्पीटलचे बिल पाहून अनेकांना धडकी बसते. अशावेळी करायचे काय, असा प्रश्न पडतो. आता देशातील सर्वात मोठी बँक SBI ने कोरोना रक्षक पॉलिसी बाजारात आणली आहे. त्यामुळे याचा अनेकांना फायदा होऊ शकतो.

कोरोना रक्षक पॉलिसीमध्ये 2 लाखांची मदत दिली जाईल :- देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने तुमच्या कोरोना खर्चासाठी एक विशेष योजना आणली आहे. ज्यामध्ये आपण फक्त 156 रुपयांमध्ये याचा फायदा घेव शकता. बँकेच्या या योजनेचे नाव कोरोना सुरक्षा पॉलिसी आहे. बँक कोविड साथीच्या आजाराशी संबंधित लोकांना आर्थिक मदत करत आहे.

18 वर्ष ते 65 वर्षांपर्यंतचे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. कोरोना संरक्षक पॉलिसीत एसबीआयतर्फे 50 हजार ते दोन लाख 50 हजार रुपयांची मदत देण्यात येत आहे. अशा परिस्थितीत ग्राहक कोरोना रक्षक पॉलिसीचा लाभ घेऊ शकतात.

Advertisement

एसबीआय कोरोना रक्षक पॉलिसीची वैशिष्ट्ये

एसबीआय कोरोना रक्षक पॉलिसी ही आरोग्य विमा संरक्षण योजना आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाचे कोविड पॉलिसी कोणत्याही वैद्यकीय चाचणीशिवाय जारी केले जाते. येथे आपल्याला 100% कव्हर मिळतील.
कोरोना रक्षक पॉलिसी खरेदी करण्याचे किमान वय 18 वर्षे आहे तर जास्तीत जास्त 65 वर्षे.
कोरोना रक्षक पॉलिसीमध्ये किमान 156 रुपये आणि कमाल 2,230 रुपये प्रीमियम भरता येऊ शकतात.
स्टेट बँकेच्या कोरोना गार्ड पॉलिसीचा कालावधी 105 दिवस, 195 दिवस आणि 285 दिवस आहे.
पॉलिसीमध्ये किमान 50 हजार आणि जास्तीत जास्त दोन लाख पन्नास हजार रुपयांचे कव्हर उपलब्ध आहे.
50 हजार रुपयांचे कवर मिळविण्यासाठी 157 रुपये द्यावे लागतात.
एसबीआय कोरोना रक्षक पॉलिसीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते सिंगल प्रीमियम रेंजमध्ये दिले जाते.

पॉलिसी बद्दल संपूर्ण माहिती येथे मिळेल :- कोरोना पॉलिसी बद्दल अधिक माहितीसाठी, ग्राहक 022-27599908 वर एक मिस कॉल देऊ शकतात.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker