Inspirational Story : तुटपुंज्या पगारामुळे लग्न जमत नव्हते! आज त्यानेच उभी केली कंपनी आज त्याचे कर्मचारी आहेत करोडपती

MHLive24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :- जीवनात असे अनेक व्यक्ती असतात कि ज्या त्यांच्या मेहनतीच्या जीवावर यशस्वी होतात. अगदी शून्यातून वैष्णव निर्माण करण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते. असेच एक प्रेरणादायी उदाहरण आहे पेटीएमचे संस्थापक विजय शेखर यांचे.(Inspirational Story )

Paytm च्या 2.5 अरब डॉलरच्या IPO नंतर, कंपनीचे वर्तमान आणि माजी कर्मचारी करोडपती होतील. असे सांगितले जात आहे की सुमारे 350 कर्मचाऱ्यांची एकूण संपत्ती किमान एक कोटी असेल. आज पेटीएम ही देशातील सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी एक बनली आहे.

पेटीएमचे संस्थापक विजय शेखर, 2017 मध्ये भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश बनले होते. एक काळ असा होता त्यांना महिन्याला फक्त 10 हजार रुपये मिळत होते. आणि इतक्या कमी पगारामुळे ते लग्न देखील करू शकत नव्हते.

Advertisement

विजय शेखर यांनी सांगितले की, ‘वर्ष 2004-05 मध्ये माझ्या वडिलांनी मला सांगितले की ही कंपनी बंद करा आणि 20-30 हजार रुपयांची नोकरी मिळवा. त्यावेळी मी एक छोटी कंपनी चालवत होतो आणि मोबाईल कंटेंट विकायचो.

लग्नासाठी कोणी आले , तर मुलगा महिनाभरात फक्त 10 हजार रुपये कमावतो, असे समजल्याने पुन्हा फोन करत नसत. मला लग्नासाठी योग्य मानले जात नव्हते.

उत्तर प्रदेशातील अलीगढ येथे जन्मलेल्या विजय शेखरचे वडील शाळेत शिक्षक होते आणि आई गृहिणी होती. विजयने सांगितले की, ‘बर्‍याच दिवसांपासून माझ्या आई-वडिलांना मुलगा काय करतोय हे कळत नव्हते.’

Advertisement

विजयचे शिक्षण हिंदी माध्यमात झाले आहे. नंतर त्यांनी दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनमध्ये इंजिनीअरिंग केले. जेव्हा त्यांनी पहिली कंपनी सुरू केली तेव्हा त्यांना 24 टक्के दराने कर्ज घ्यावे लागले.त्यानंतर 2011 मध्ये, Paytm सुरू केले जे पे थ्रू अॅपचे शॉर्ट टर्म आहे.
आणि आज केवळ विजय शेखरच नव्हे तर अनके कर्मचारी करोडपती होण्याच्या मार्गावर आहेत.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker