CM Vijay Rupani Resigns गुजरात मध्ये खळबळ! मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा !

MHLive24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :- गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. रुपानी यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. (CM Vijay Rupani Resigns

आपल्याला संधी दिली, त्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. तसेच यापुढे पक्ष देईल, ती जबाबदारी स्वीकारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

Advertisement

CM Vijay Rupani Resigns

गुजरातमध्ये राजकीय हालचालींना वेग

दरम्यान विजय रुपानी यांनी राजीनामा दिल्याने गुजरातमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. आता मुख्यमंत्रीपदाची सुत्रे कोणाच्या हातात देण्यात येणार, याबाबत चर्चा सुरू आहे. पक्षातील अंतर्गत कलहामुळे रुपानी यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.

Advertisement

पक्षासाठी काम करणार – विजय रुपाणी 

मात्र, भाजपात वेळेनुसार जबाबदाऱ्या बदलत असतात. आपल्याला दिलेली जबाबदारी आपण निष्ठेने पार पाडली असून यापुढे पक्षासाठी काम करणार असल्याचे रुपानी यांनी सांगितले.

आजवर मिळालेल्या सहकार्याबाबत सर्वांचे आभार

Advertisement

विजय रुपाणी यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला. त्यानंतर रुपाणी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत त्यांना आजवर मिळालेल्या सहकार्याबाबत सर्वांचे आभार व्यक्त केले.

राज्यपालांची भेट घेण्यासाठी विजय रुपाणी यांच्यासोबत उपमुख्यमंत्री नितीन पटेल देखील उपस्थित होते. गुजरातमध्ये डिसेंबर २०२२ साली विधानसभा निवडणूक नियोजित आहे.

विधानसभा निवडणूक नव्या चेहऱ्यासह लढण्याची तयारी

Advertisement

त्याआधीच विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यामुळे आता गुजरात भाजपामध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणूक नव्या चेहऱ्यासह लढण्याची तयारी भाजपाकडून केली जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून आम आदमी पक्ष देखील गुजरातमध्ये भाजपाला टक्कर देत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे पक्षात मोठे फेरबदल केले जाणार असल्याचं बोललं जात आहे.

कोण होणार पुढील मुख्यमंत्री ? 

Advertisement

रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर गुजरातचे आगामी मुख्यमंत्री म्हणून नितीन पटेल यांच्याकडे सूत्रे जाण्याची शक्यता आहे. आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता

तेव्हाही नितीन पटेल मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये होते. आता रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

जाणून घ्या कोण आहेत विजय रुपाणी? Who Is Vijay Rupani 

Advertisement
  1. गुजरात रुपाणी यांनी गुजरताचं मुख्यमंत्रिपद भूषवलं, ते सध्या 65 वर्षांचे
  2. 7 ऑगस्ट 2016 रोजी त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली
  3. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या जवळचे
  4. भाजपा आणि संघ यांच्यातील दुवा
  5. आनंदीबेन पटेल यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी वाहतूक, पाणीपुरवठा, कामगार तसेच रोजगार अशी मंत्रिपदं
  6. गुजरातमध्ये अनेक वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम त्यांनी पाहिलं.
  7. रुपाणी हे 1996 मध्ये राजकोटचे महापौर होते
  8. 2006 ते 2012 या काळात राज्यसभा खासदार
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

वाचा आणखी बातम्या – 

वाहनांच्या नंबरप्रमाणेच आता तुम्ही तुमच्या पसंतीचा आधार क्रमांक निवडू शकाल? UIDAI ने दिली ‘ही’ महत्वाची माहिती

धक्कादायक ! वोडाफोन-आयडिया सिममुळे उडाले लाखो रुपये, आता झाला ‘हा’ निर्णय

Advertisement

स्टेट बँकचा अलर्ट ! 20 दिवसांत करा ‘हे’ काम अन्यथा थांबतील पैशांचे व्यवहार

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker