MHLive24 टीम, 24 डिसेंबर 2021 :- असं म्हटलं जातं की, तुम्ही जे खाता तसे तुम्ही असता आणि हेच संतुलित आयुष्य जगण्याचे सर्वात चांगले सूत्र आहे.(Cholera information)

रोजच्या आहारात पौष्टिक घटक कोणते आहेत याचा विचार करून आहार ठरवणे हे कोरोना साथीच्या काळात अतिशय आवश्यक बनलेले आहे.

कमी प्रतिकारशक्ती, पचन नीट न होणे, सतत आरोग्याच्या तक्रारी द्र करायच्या असतील, तर केवळ औषधे घेऊन उपयोग नाही, तर त्यापलीकडे पाहण्याची गरज आहे.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चवीपेक्षा पौष्टिक आहाराला प्राधान्य देणे गरजेचे आहे. संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यातूनच या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणे शक्‍य होते. चांगली पचनक्षमता आणि प्रतिकारशक्ती असणे ही सध्याची मोठी गरज बनलेली आहे.

आपण पौष्टिक आहार खाल्ला आणि त्यातील महत्त्वपूर्ण पौष्टिक घटक आपल्या शरीरातील पेशी आणि टिश्‍्यूंनी शोषून घेतले, त्याचे ऊर्जत रूपांतर झाले, तरच रोजची कामे न थकता करण्याची क्षमता आपल्याला प्राप्त होत असते. या सगळ्या प्रक्रियेला मेटॅबॉलिझम असे म्हणतात. ते तीन मुख्य शक्तींनी कार्य करते. पित्त, वात आणि कफ. आता आपण पित्त दोष विषयी जाणून घेऊ.

पित्तदोष म्हणजे काय ?

आयुर्वेदानुसार नैसर्गिक स्थिती म्हणजे प्रकृती आणि तुमची प्रकृती कशी आहे ते पित्त, वात आणि कफ ठरवत असतात. पित्त हे अग्नी आणि जलम म्हणजेच पाणी यांचे मिश्रण असते. गरम, तेलकट आणि तिखट अशी पित्ताची वैशिष्ट्ये असतात. पित्तदोष म्हणजे शरीरातील पित्ताचे प्रमाण जास्त होते आणि त्यातून पित्ताचे शरीरात असंतुलन होते.

पित्ताचे असंतुलन झाल्यावर काय होते?

शरीरात पित्ताचे संतुलन असले की, शरीर तंदुरुस्त राहते, आवश्यक तेवढी झोप मिळते, माणूस तर्कसंगत विचार करतो, उच्च बुद॒ध्यांक आणि चांगली स्मरणशक्ती, प्रवाही बोलणे या गोष्टी घडत राहतात. त्यात असंतुलन झाले की राग येणे, चिंता, त्वचेवर डाग, केस गळणे अशा गोष्टी घडू लागतात.

पित्तदोषाचे अन्य परिणाम काय होतात?

उन्हाळ्यात उन्हाळी पित्तदोष जाणवतो. त्यामुळे शरीरात उष्णता वाढते. पित्तदोषाचा काही प्रतिकूल

परिणाम पुढीलप्रमाणे :

तहान आणि भूक वाढते.
असिडिटी वाढते, पोटात वात धरतो, पचनाच्या तक्रारी सुरू होतात.
खाण्यावरील मन उडते, जुलाब, बद्धकोष्ठता आणि अन्य पोटाच्या तक्रारी सुरू होतात.
केस जास्त गळू लागतात.
संप्रेरकांचे असंतुलन होते.
महिलांना पाळीच्या दिवसांत जास्त स्राव जातो, वेदना वाढतात.
डोकेदुखी, अर्धशिशी असे त्रास उद्‌भवतात.
श्वासाला दुर्गंधी येते, शरीराला वास येतो.
चिंता, ताण जाणवतो. नाराजी, राग किंवा नैराश्य अशा भावना मनात निर्माण होतात.
निद्रानाश किंवा शांत झोप लागत नाही.

आहाराद्वारे पित्तदोबाचे संतुलन कसे साधावे?

योग आणि ध्यानाद्वारे पित्तदोष बराचसा दू होतो. कारण त्यामुळे मनाला शांती प्राप्त होते. पित्तदोष संतुलित करण्यासाठी आपल्या खाण्याच्या सवयींमध्ये बदल करावा लागतो. पचण्यासाठी जड पदार्थ म्हणजे सोया सॉस, सॉल्टेड बटर, वाईन, चॉकलेट इत्यादी पदार्थ टाळावेत. या पदार्थांमुळे शरीरात जळजळ होते.

१) कोणत्या भाज्या खाव्यात : कोबी, काकडी, फ्लॉवर, मटार, वाल, रताळी, पालेभाज्या, भोपळा या भाज्या आवर्जून खाव्यात.

२) पित्तदोष संतुलित करण्यात उपयुक्त धान्ये : गहू, तांदूळ, बाली इत्यादी धान्ये आहारात असावीत.

३) फळे : सफरचंद, नारळपाणी आणि त्यातील मलई, कलिंगड, संत्री, डाळिंब, पीअर्स आणि आंबे खावे. सुकामेवा खाणे टाळावे. साखर खाण्यापेक्षा खांडसरी चा वापर करावा. गूळटाळा.

४) दुधाचे पदार्थ : ताजे दूध, दही, ताकाचे सेवन करा. घरात तयार केलेल्या तुपाचा आहारात समावेश करा. खाण्यात हळद, जिरे, बडीशेप अशा मसाल्याच्या पदार्थांचा वापर करा. काळे मिरे अल्प प्रमाणात वापरा. सॅलड वर मिरपूड भुरभुरण्यापुरती किंवा शिजवलेल्या अन्नातील चवीपुरती वापरा. जेवणात तिखट आणि मिठाचे प्रमाण कमी करा.

मटण, अंडी आणि मासे खाऊ शकता?

तुम्ही अंडी खाऊ शकता. कारण त्यामध्ये प्रोटीन्स भरपूर असतात. मात्र, पित्त दोष असल्यावर शाकाहार सगळ्यात उत्तम. चिकन, मटण, मासे टाळणे योग्य ठरते.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit